अमरावती मनपा स्‍थायी समिती सभापतीपदी अविनाश मार्डीकर

महायुतीची एकजुटी कायम

    दिनांक :06-Mar-2026
Total Views |
अमरावती,
avinash mardikar अमरावती महानगरपालिकेच्‍या स्‍थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अविनाश मार्डीकर यांची निवड करण्‍यात आली. महायुतीची एकजुटी कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
 
सभापतीपदी अविनाश मार्डीकर
 
आज सकाळी ११ वाजता स्‍व. सुदामकाका देशमुख सभागृह येथे स्‍थायी समिती सभापतीसाठी निवडणुक घेण्‍यात आली. या निवडणुकीत अविनाश मार्डीकर यांना ११ मते प्राप्‍त झाली असल्‍यामुळे त्‍यांची सभापतीपदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. त्याचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे प्रशांत महल्‍ले यांना ३ मते प्राप्‍त झाली आहे. या निवडणुकीत समितीचे सर्व १६ सदस्य सहभागी झाले. २ सदस्य तटस्थ होते.avinash mardikar या निवडणुकीत पिठासिन अधिकारी म्‍हणुन जिल्‍हाधिकारी आशिष येरेकर यांनी काम पाहीले. सर्वप्रथम पिठासिन अधिकारी व महानगरपालिका आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांनी स्‍थायी समिती सभापतीपदी अविनाश मार्डीकर यांचे पुष्‍पगुच्‍छ देवुन अभिनंदन केले. महापौर श्रीचंद तेजवाणी, उपमहापौर सचिन भेंडे, सभागृह नेता चेतन गावंडे, गटनेता नाना आमले, डॉ.राजेंद्र तायडे, शेख हमिद शेख वाहेद, पदाधिकारी, नगरसेवक व नगरसेविका यांनी पण त्याचे अभिनंदन केले.