विहिरीत आढळला युवकाचा मृतदेह

आकस्मिक मृत्यूची नोंद

    दिनांक :06-Mar-2026
Total Views |
कारंजा लाड, 
body-found-in-well : शहरातील खाटीकपुरा परिसरातील रहिवासी दुर्गेश सुभाष माहोरे या ३२ वर्षीय युवकाचा मृतदेह ६ मार्च दुपारी २ वाजताच्या सुमारास शहरालगतच्या ड्रीमलॅन्ड सिटी परिसरातील विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
 
 
j
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, दुर्गेश माहोरे हे गुरुवार पासून घरून निघून गेले होते. त्यानंतर शोधाशोध केली असता आढळून आले नाही. त्यांचा शोध सुरू असताना शुक्रवारी दुपारी सावरकर चौका जवळील ड्रीमलॅन्ड सिटी परिसरातील विहिरीत त्यांचा मृतदेह एका व्यक्तीला आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाहेर काढून पुढील तपासासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. या कार्यात सास संस्थेचे हर्षल रामटेके व विजय पांढरे यांनी मदत केली. या प्रकरणी राम मधुकर कंटाळे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत. मृत्यूचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही.