शेतकरी कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा निर्णय; कर्जमाफी योजना जाहीर

    दिनांक :06-Mar-2026
Total Views |
मुंबई, 
fadnavis-decision-on-farmer-loan मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करत शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्यात समिती स्थापन करण्यात आली आहे.
 
fadnavis-decision-on-farmer-loan
 
योजनेत दिलेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. यासाठी जाहीर करण्यात आलेली योजना 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' असे नाव घेऊन सुरू करण्यात आली आहे. fadnavis-decision-on-farmer-loan या योजनेनुसार, ज्या शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंत कर्ज थकीत आहे, त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. याशिवाय, जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात, अशा पात्र शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येईल, असेही अर्थसंकल्पात सांगितले गेले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, बँकिंग यंत्रणा सक्षम असावी, यासाठी समितीच्या शिफारशींनुसार निर्णय घेण्यात येणार आहेत. fadnavis-decision-on-farmer-loan तसेच, समितीच्या निकष आणि शिफारशींचा विचार करून दीर्घकालीन योजना तयार करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील.
 
गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा चांगलाच तापला होता. विरोधकांकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशी मागणी जोर धरत होती. या मागणीसाठी नागपुरात प्रहारचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन देखील केले होते. त्यावेळी सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले गेले होते. याबरोबरच, आगामी दोन वर्षांमध्ये महाराष्ट्रात ‘नैसर्गिक शेती अभियान’ सुरू करण्यात येणार आहे. यासोबत महिला गोपालक आणि शेळीपालकांसाठीही विशेष योजना राबविण्यात येणार असून, यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.