मुंबई,
five-jyotirlingas-in-maharashtra आज विधानसभेत महाराष्ट्र राज्याचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर त्यांनी या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांसंबंधी महत्वाचा निर्णय जाहीर केला.
राज्यातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी पाच ही महाराष्ट्रात आहेत. या पाच ज्योतिर्लिंगांसाठी यंदाच्या बजेटमध्ये मोठी तरतूद करण्यात आली असून, प्रत्येक ज्योतिर्लिंगासाठी वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांकडे समन्वयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या पाच ज्योतिर्लिंगांसाठी आवश्यक निधी पुरवला जाईल आणि सर्व कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी समन्वय सुनिश्चित केला जाईल. five-jyotirlingas-in-maharashtra पाच ज्योतिर्लिंगांमध्ये नाशिक येथील त्र्यंबकेश्वर, पुण्यातील खेड येथील भीमाशंकर, छत्रपती संभाजीनगरजवळील वेरुळ येथील घृष्णेश्वर, बीड जिल्ह्यातील परळी जवळील वैजनाथ मंदिर आणि हिंगोलीतील औंढा नागनाथ यांचा समावेश आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात वाहतूक क्षेत्राचे संपूर्ण केंद्रीकरण करण्याचे आणि १०० टक्के डिजिटायझेशन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मुंबई-आह्मदाबाद बुलेट ट्रेन मार्गातील कामे २०२७ पर्यंत पाच स्थानकांवर पूर्ण केली जातील. त्याचप्रमाणे रायगड पेण आणि नवी मुंबई विमानतळ ग्रीन फील्ड प्रकल्प म्हणून विकसित केले जातील. तसेच, मुंबई वाढवण येथे चौथी मुंबई विकसित करण्याचे तसेच एमएमआरमध्ये दहा लाख नवीन घरे उभारण्याचे नियोजन केले गेले आहे.