"त्याच्या" सैन्य होण्याच्या पंखांना शहापुरात मिळाले बळ!

रावळपिंडीतील दहशतवादी तळ उध्वस्त केला होता

    दिनांक :06-Mar-2026
Total Views |
भंडारा,
purvesh durugkar सैन्यात अधिकारी होण्याच्या त्याच्या स्वप्नांना एसजीबी डिफेन्स सर्विसस अकॅडमीच्या प्रांगणातच दिशा मिळाली. आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि देश प्रेमाच्या जोरावर भारतीय वायुसेनेतील फ्लाईट लेफ्टनंट या पदाला गवसणीही घातली. सैन्याने ज्या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून देशाचा गौरव वाढविला, त्यात सहभागी होत पाकिस्तानातील दहशतवादी तळ उध्वस्त केले, त्या पूर्वेशचे शहीद होणे आज शहापूरच्या डिफेन्स अकॅडमीतील प्रत्येकाला चटका लावून गेले. त्याने दोन वर्षे या परिसरात घालवलेल्या प्रत्येक क्षणाची आठवण या निमित्ताने उजागर झाली.
 
 
 सैन्य होण्याच्या पंखांना शहापुरात मिळाले बळ!
 
 
आसाम येथे वायुसेनेच्या झालेल्या एका विमान दुर्घटनेत दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश दुरुगकर हे नागपूर येथील सुपुत्र आहेत. त्यांची जन्मभूमी नागपूर असली, तरी दहावीनंतर पुढचे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी भंडारा जिल्ह्यातील शहापूर येथील एसजीबी डिफेन्स सर्विसेस अकॅडमी निवड केली. सैन्यात अधिकारी होण्याची मनात जिद्द बाळगून ॲकॅडमीत दाखल अनेक तरुणांपैकी पूर्वेश एक होता. अकरावी आणि बारावीचे शिक्षण येथे घेतल्यानंतर एएफसीएटी या परीक्षेच्या माध्यमातून त्याने अधिकारी पद मिळविले. भारतीय सैन्यात झालेली त्याची निवड अकॅडमीत तील प्रत्येकासाठी नवी ऊर्जा देणारी होती. अकॅडमीत सैन्य सेवेविषयी मिळालेल्या बाळकडूच्या जोरावर सैन्यात अधिकारी पदापर्यंत पोहोचलेला पूर्वेश कधीही अकॅडमी ला विसरला नाही अशी प्रतिक्रिया अकॅडमी चे संचालक नरेंद्र पालांदूरकर यांनी दिली.purvesh durugkar अधिकारी झाल्यावर त्याचा आम्ही सत्कार केला. तू प्रत्येक क्षण आज डोळ्यापुढे येत असल्याचे ते म्हणाले. भारतीयाचा उर अभिमानाने भरून यावा अशा ऑपरेशन सिंदूर मध्ये पूर्वेश याने सहभागीत आपल्या कौशल्याने पाकिस्तानातील रावळपिंडी येथील दहशतवादी तळ उध्वस्त केल्याचेही ते म्हणाले. आज त्याची या देशासाठी शहीद होणे आमच्यासाठीही मोठा धक्का आहे, असे ते म्हणाले.
ज्या अकॅडमीच्या परिसरात पूर्वेस घडला, तो परिसर आज त्याच्या आठवणीत रमला होता.