नीलम ‘बाहुलीसारखी’ वाटायची

    दिनांक :06-Mar-2026
Total Views |
मुंबई,
Govinda Neelam Kothari affair rumors, बॉलिवूडमधील ‘हिरो नंबर 1’ म्हणून ओळखले जाणारे गोविंदा सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नी सुनीता आहूजा यांनी एका मुलाखतीत गोविंदाचे अफेअर सुरू असल्याचा आरोप केला होता. मात्र या आरोपांना गोविंदाने स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले. या पार्श्वभूमीवर आता १९८०–९० च्या दशकात अभिनेत्री नीलम कोठारी हिच्यासोबतच्या त्यांच्या नात्याच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.
 

Govinda Neelam Kothari affair rumors, 
अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत गोविंदाने नीलमबद्दल बोलताना तिच्याबद्दल असलेले आकर्षण मान्य केले आहे. सिद्धार्थ कन्नन यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, नीलम खूप वेगळी आणि अतिशय चांगली मुलगी होती. “आमच्यासारख्या गावाकडच्या मुलांना गोऱ्या मुली खूप आवडतात. विरुद्ध स्वभावातील आकर्षण असणे अगदी नैसर्गिक आहे. नीलमला पाहिल्यावर ती एखाद्या बाहुलीसारखी दिसायची,” असे गोविंदाने सांगितले.
गोविंदाने पुढे सांगितले की नीलमच्या व्यक्तिमत्त्वाने ते त्या काळात खूप प्रभावित झाले होते. तिचे चित्रपट पाहताना ते शिट्ट्या मारायचे, अशी आठवणही त्यांनी सांगितली. पुढे नीलमसोबत काम करण्याची संधी मिळेल असे त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. मात्र जेव्हा ती त्यांच्या चित्रपटांची सहकलाकार बनली, तेव्हा त्यांना सुरुवातीला त्यावर विश्वासच बसत नव्हता, असेही त्यांनी नमूद केले.त्या काळातील नातेसंबंध आणि रोमांस आजच्या काळापेक्षा खूप वेगळे होते, असेही गोविंदाने या मुलाखतीत सांगितले. “त्या वेळी अफेअर्स आजच्या सारखे उघडपणे नव्हते. आम्ही फक्त मजा-मस्ती करायचो आणि काहीतरी सुरू आहे असे वाटायचे. त्या काळातील प्रेम बहुतेक वेळा नजरेतूनच व्यक्त व्हायचे,” असे ते म्हणाले. गोविंदा आणि नीलम यांनी एकत्र केलेले अनेक चित्रपट Govinda Neelam Kothari affair rumors आणि गाणी त्या काळात सुपरहिट ठरल्याचेही त्यांनी सांगितले.दरम्यान, गोविंदा आणि नीलम यांच्या नात्याबद्दलच्या चर्चा नव्या नाहीत. सुमारे ३६ वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीतही गोविंदाने तिच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्याचे सांगितले जाते. काही माध्यमांतील दाव्यानुसार, एका काळात ते नीलमवर इतके फिदा झाले होते की तिच्याशी लग्न करण्याचाही त्यांनी विचार केला होता. त्यावेळी त्यांनी सुनीतासोबतचा साखरपुडाही तोडल्याची चर्चा होती. मात्र पुढे त्यांनी सुनीताशीच विवाह केला.आजही गोविंदा आणि नीलम यांच्या मैत्रीबद्दल आणि त्या काळातील त्यांच्या नात्याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता कायम आहे. जुन्या आठवणींना उजाळा देताना गोविंदाने केलेल्या या खुलाशामुळे बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा या जोडीची चर्चा रंगली आहे.