नवी दिल्ली
sukhoi aircraft crash भारतीय हवाई दलाचे (आयएएफ) लढाऊ विमान सुखोई एसयू-३०एमकेआय गुरुवारी रात्री आसामच्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यात कोसळले. या अपघातात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला.
आयएएफने म्हटले आहे की, "एसयू-३०एमकेआय लढाऊ विमान प्रशिक्षण मोहिमेवर होते आणि जोरहाटपासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या आसाममधील कार्बी आंगलोंग भागात ते कोसळले."
आसाममध्ये सुखोई लढाऊ विमान कोसळले
भारतीय हवाई दलाने गुरुवारी, ५ मार्च रोजी रात्री ९:३४ वाजता लढाऊ विमान बेपत्ता झाल्याची माहिती दिली. लढाऊ विमानाने आसाममधील जोरहाट येथून उड्डाण केले आणि शेवटचा संपर्क ७:४२ वाजता झाला. एसयू-३०एमकेआय हे रशियन विमान उत्पादक सुखोईने बनवलेले दोन आसनी लढाऊ विमान आहे. लढाऊ विमान बेपत्ता झाल्यानंतर आयएएफने लगेचच शोध मोहीम सुरू केली.
आयएएफला रात्री उशिरा लढाऊ विमान सापडले.
रात्रि उशिरा हवाई दलाने सुखोई लढाऊ विमान सापडल्याचे वृत्त दिले, परंतु विमान आधीच कोसळले होते.sukhoi aircraft crash भारतीय हवाई दलाने आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात सुखोई एसयू-३०एमकेआय लढाऊ विमान कोसळल्याचे वृत्त दिले.