वॉशिंग्टन,
iranian-drone-launcher-destroyed युनायटेड स्टेट्स सेंट्रल कमांड ने शुक्रवार, ६ मार्चच्या सकाळी मोठा दावा करत इराणच्या ड्रोन वाहून नेणाऱ्या एका जहाजावर जोरदार हल्ला केल्याचे सांगितले. या हल्ल्यानंतर जहाजाला भीषण आग लागल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या कारवाईचा दृश्यफीतही प्रसिद्ध करण्यात आला असून त्यात सलग हल्ल्यांनंतर जहाज धगधगत असल्याचे दिसून येत आहे. मात्र ही बातमी लिहिली जात असताना इराणी सशस्त्र सेना कडून या हल्ल्याची अधिकृत कबुली देण्यात आलेली नव्हती. यापूर्वीही युद्धादरम्यान झालेल्या लष्करी नुकसानीबाबत तेहरान कडून फारशी माहिती उघड करण्यात आलेली नाही.

सेंट्रल कमांडने समाजमाध्यमावरील संदेशात म्हटले की अमेरिकन सैन्य इराणच्या नौदल क्षमतेवर प्रहार करण्याच्या मोहिमेत कोणतीही माघार घेणार नाही. या जहाजाचा आकार जवळपास दुसऱ्या महायुद्धातील विमानवाहू जहाजाएवढा असल्याचेही त्यांनी नमूद केले. iranian-drone-launcher-destroyed मात्र हा हल्ला नेमका कुठे करण्यात आला, याबाबत त्यांनी स्पष्ट माहिती दिली नाही. ही कारवाई अशा वेळी करण्यात आली आहे, जेव्हा अमेरिकन सैन्याने इराणच्या सागरी क्षमतेवर सतत दबाव ठेवण्याची भूमिका जाहीर केली आहे. दरम्यान वृत्तसंस्था असोसिएटेड प्रेस च्या अहवालानुसार या ड्रोन वाहक जहाजाचे नाव IRIS शाहिद बाघेरी असे आहे. हे जहाज पूर्वी मालवाहू कंटेनर जहाज होते, परंतु त्यामध्ये बदल करून ते ड्रोन वाहून नेणाऱ्या लष्करी जहाजामध्ये रूपांतरित करण्यात आले.
इराणने हे जहाज फेब्रुवारी २०२५ मध्ये कार्यान्वित केले होते. या जहाजावर ड्रोन उड्डाणासाठी सुमारे १८० मीटर लांबीचा धावपट्टीसारखा मार्ग तयार करण्यात आला आहे. तसेच कोणत्याही बंदरात इंधन न भरता हे जहाज सुमारे २२ हजार सागरी मैलांपर्यंत प्रवास करू शकते, अशी माहितीही अहवालात देण्यात आली आहे.