हिंदूंनी एकत्रितपणे भारतमातेच्या रक्षणासाठी सज्ज राहावे

-महंत सांवरिया बाबा यांचे उद्बोधन -यवतमाळच्या अयोध्यानगरात हिंदू संमेलन उत्साहात

    दिनांक :06-Mar-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
yavatmal-hindu-conference : संघ शताब्दीनिमित्य सर्वत्र विशाल हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून येथील सकल हिंदू समाजाच्या सहकार्याने अयोध्यानगर वस्ती येथे विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन रविवार, 22 फेब्रुवारीला करण्यात आले.
 

y6March-Sawariya-(1) 
 
 
 
यावेळी व्यासपीठावर महंत धर्माचार्य सांवरिया बाबा, प्रमुख वक्ता म्हणून विश्व हिंदू परिषद तथा दुर्गावाहिनी विदर्भ प्रांत शक्ती साधना केंद्रप्रमुख आकांक्षा वर्मा, तसेच प्रेरक उद्बोधक म्हणून विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत सेवाप्रमुख राम लोखंडे यांची उपस्थिती होती.
 
 
 
सकाळच्या बाईक रॅलीने सुरवात आणि नंतर दुपारी परिसरात झालेल्या शोभायात्रेचे रूपांतर हिंदू संमेलनात झाले. दीपप्रज्वलन, भारतमाता पूजन, प्रकृती वंदन अंतर्गत पारंपरिक वृक्षपूजन, गोमाता पूजन यांनी सोहळ्याला सुरवात झाली.
 
 
यावेळी आशीर्वचनपर बोलताना सांवरिया बावा यांनी आपल्या उद्बोधनात, हिंदू धर्म हा सहिष्णू आहे म्हणून कोणीही त्याचा गैरफायदा घेऊ नये. हिंदू समाज त्याविरुद्ध आवाज उठविल्याशिवाय राहणार नाही. तसेच हिंदूंनीसुद्धा आपल्यातील भेदभाव दूर करून जातीपातीच्या राजकारणापासून वर आले पाहिजे. कारण राष्ट्र प्रथम ही भावना प्रत्येकामध्ये असणे काळाची गरज असल्याचे, प्रतिपादन त्यांनी केले.
 
 
संमेलन वक्ता आकांक्षा वर्मा यांनी हिंदू स्त्रीने हिंदुधर्म परंपरेने राहिले पाहिजे. तसेच हिंदू मुलींनी लव्ह जिहादसारख्या पडयंत्राला बळी पडू नये आणि हिंदू आईने घरी योग्य संस्कार देणे गरजेचे असल्याचे आपल्या उद्बोधनात म्हटले.
 
 
प्रमुख वक्ते राम लोखंडे यांनी आपल्या प्रेरक उद्बोधनात संघाला अभिप्रेत पंच परिवर्तनातील पाचही घटकांचा उलगडा करताना आजच्या काळात पंच परिवर्तन कसे महत्वाचे आहे की, ज्यामुळे राष्ट्र मजबूत होईल, हे पटवून दिले.
 
 
या संमेलनाचे प्रास्ताविक व परिचय प्रदीप देशमुख यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी संमेलनाचा उद्देश विशद करताना आम्ही खèया अर्थाने हिंदू म्हणून जगले पाहिजे, असे म्हटले.
 
 
संचालन सुलक्षणा लुले यांनी व आभारप्रदर्शन नरेंद्र रामेकर यांनी केले. संमेलनाला मोठ्या संख्येने हिंदू बांधवांची उपस्थिती होती. भारतमातेच्या आरती नंतर महाप्रसादाने संमेलनाची सांगता झाली.