मुंबई,
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत २०२६-२७ वर्षासाठीचा राज्याचा अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्पाच्या सादरीकरणादरम्यान राज्यातील महिला वर्गाचे लक्ष विशेषत: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वर लागले होते. गेल्या काही दिवसांपासून या योजनेबाबत पसरलेल्या अफवा आणि शंका यावर मुख्यमंत्र्यांनी आज स्पष्टीकरण दिले.
मुख्यमंत्र्यांनी योजनेच्या Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana भवितव्याबाबत माहिती देताना स्पष्ट सांगितले की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशीच सुरू राहणार आहे. तसेच या योजनेकरिता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आली आहे.” मात्र, या योजनेतून महिलांना मिळणाऱ्या लाभामध्ये कोणतीही वाढ करण्याची घोषणा आज केली गेलेली नाही.राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारच्या आधीच्या कार्यकाळात जाहीर केलेली ही योजना अत्यंत लोकप्रिय ठरली आहे. योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळतात. मात्र या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण येत असल्याचेही समोर आले आहे. यामुळे अनेकदा हप्ते लांबणीवर पडल्याचे प्रकारही घडले आहेत.आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पामध्ये स्पष्टपणे योजनेच्या सुरू राहण्याची हमी दिल्यामुळे, लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे या योजनेंतर्गत महिलांना नियमित आर्थिक मदत मिळत राहणार आहे आणि या चर्चेचा विषय असलेल्या गैरसमजांवरही विराम पडला आहे.