नागपूर,
The South Public School दि साउथ पब्लिक स्कूल, ओंकारनगर येथे मराठी गौरव दिनानिमित्त मराठी सप्ताहचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विस्मरणात गेलेल्या वृत्तबद्ध कविता, एकपात्री प्रयोग, मराठी लोकसाहित्य, म्हणी व वाक्प्रचार, तसेच नांदी, पोवाडा, भारुड यांसारखी पारंपारिक लोकनृत्ये सादर केली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त इयत्ता पहिली ते पाचवी वर्गातील विद्यार्थ्यांनी संतांच्या जीवनातील विविध प्रसंग रंगभूमीवर सादर केले. तसेच, प्रसिद्ध गायक मिर्झा रफी बेग यांच्या कविताही विद्यार्थ्यांनी सादर करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

सुमारे दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने शालेय परिसराचे नाव “संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर नगरी” असे ठेवण्यात आले होते. पंचभाषिक कवयित्री व साहित्य विहार संस्थेच्या संचालिका आशा पांडे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उदयोन्मुख बाल कीर्तनकार चित. The South Public School देवव्रत देशपांडे यांनी मंत्रमुग्ध करणारे कीर्तन केले. आशा पांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सांगितले, “प्रत्येक भाषेत आपली संस्कृती व संवेदनशीलता रुजलेली असते; कोणत्याही भाषेवर द्वेष न करता भाषांवर प्रेम केल्यास आयुष्य समृद्ध होते.”
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या “वेध” या हस्तलिखिताचे प्रकाशनही आशा पांडे यांच्या हस्ते करण्यात आले. याशिवाय, व. ल. लिंगे स्मृती सर्वोत्कृष्ट लेखिका पुरस्कार ब.स. हेडावू आणि कनगी नंदेश्वर या विद्यार्थिनींना देण्यात आले. The South Public School कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिरंजीव, अनिकेत कोल्हेकर, चैतन्य काळी आणि आराध्या भोरे यांनी केले, तर कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली. शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतलेल्या सर्व शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले.
सौजन्य: शिल्पा नंदनपावर, संपर्क मित्र