मुंडीकोटा-तुमसर रेलमार्गावरील समपार फाटक बंद

वाहतूक जवळील आरओबीमार्गे वळविणार

    दिनांक :06-Mar-2026
Total Views |
गोंदिया,
Mundikota-Tumser railway crossing, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाअंतर्गत मुंडीकोटा-तुमसर रेलखंडादरम्यान असलेले मानव रहित समपार फाटक क्रमांक 532 येथे सीमित उंचीचा अंडरपास (लिमिटेड हाईट सबवे) उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या बांधकामाच्या पार्श्वभूमीवर संबंधित समपार फाटक 10 मार्च 2026 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून सर्व प्रकारच्या रस्ते वाहतुकीसाठी तात्पुरते बंद करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
 

Mundikota-Tumser railway crossing,  
बांधकाम सुरू असताना या समपार फाटकावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी व वाहतुकीची सुसूत्रता राखण्यासाठी या मार्गावरील वाहतूक जवळील रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) मार्गे वळविण्यात येणार आहे. बांधकाम कालावधीत पर्यायी मार्गाचा वापर करावा व काम सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन रेल्वे प्रशासनाने नागरिकांना केले असून या काळात होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने खेद व्यक्त केला आहे.