नागपूर,
Nagpur Metro आज नागपूर मेट्रोच्या उद्घाटनाला ७ वर्ष पूर्ण झाले. नागपुरातील पहिली मेट्रो एअरपोर्ट साऊथ ते जयप्रकाश नगर स्टेशन दरम्यान धावली होती. हे निश्चितच अभिमानाचे आणि आनंदाचे कारण आहे. मात्र, खंताची बाब अशी आहे की, मेट्रोच्या पहिल्या स्थानकाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. विशेषतः सीताबर्डीकडे जाणारी बाजू अजून सुरू झाली नाही.
स्थानकाबाबत वारंवार मेट्रो प्रशासनाकडे विचारणा केली असता, प्रत्येकवेळी “२ महिन्यांत सुरू करू” असे पोकळ आश्वासन दिले जाते. याशिवाय, स्थानकाजवळ लोकांच्या येण्याजाण्याच्या मार्गावर चष्म्याची व इतर दुकाने लावल्यामुळे पदपथ गिळंकृत झाले असून, वाहतुकीला मोठी अडचण निर्माण झाली आहे. Nagpur Metro हे विमानतळाकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या चौकात असून स्थानिक प्रशासनाकडे याबाबत कमाल अनास्था दिसते. दुकानांमुळे आणि ग्राहकांच्या वाहनांमुळे येथे अनेक अपघात होतात, मात्र वाहतूक पोलीस फक्त विना-हेल्मेट कारवाईवर लक्ष केंद्रीत करत असल्याचेही नागरिकांकडून तक्रार आहे.
सौजन्य: मिलिंद तोतरे, संपर्क मित्र