माधुरी हत्तिणीसाठी महाराष्ट्रातील पहिलेच अत्याधुनिक हत्ती पुनर्वसन केंद्र

    दिनांक :06-Mar-2026
Total Views |
जयसिंगपूर
Nandani elephant rehabilitation, नांदणी (ता. शिरोळ) येथील प.पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठाने महादेवी ऊर्फ माधुरी हत्तिणीच्या पुनर्वसनासाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. मठाच्या सहा एकर जागेत सर्व सोयीनियुक्त प्रशस्त “माधुरीवाडा” उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, हा प्रकल्प गुजरात येथील वनतारा प्रकल्प आणि नांदणी मठ यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणार आहे.
 

Nandani elephant rehabilitation, Madhuri Hattini project 
पश्चिम महाराष्ट्रातील अशा प्रकारचे पहिलेच अत्याधुनिक हत्ती पुनर्वसन केंद्र या प्रकल्पाद्वारे उभारले जाणार आहे. महाराष्ट्र शासन, वनतारा आणि नांदणी मठ यांच्यात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत माधुरी हत्तिणीच्या प्रकृतीचा आढावा घेतला असून, केंद्राला हिरवा कंदील दाखवण्यात आला होता.केंद्र उभारणीसाठी आवश्यक परवानगींची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. महावितरण, ग्रामपंचायत, पाटबंधारे आणि पशुवैद्यकीय विभागाकडून आवश्यक परवाने मिळालेली आहेत. सध्या फक्त बांधकाम परवाना आणि प्राणिसंग्रहालय विभागाचा परवाना मिळणे बाकी असून, लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. वनताराचे तज्ज्ञ पथक लवकरच कोल्हापूर दौऱ्यावर येऊन माधुरीवाडा प्रकल्पाचे अंतिम डिझाइन निश्चित करेल, त्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल.
प्रकल्पात ऐतिहासिक Nandani elephant rehabilitation, वारसा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम दिसून येईल. बाहेरच्या बाजूला हा केंद्र दगडी बांधकामात उभारण्यात येईल, तर आत हत्तींच्या आरोग्यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतील. या सुविधांमध्ये हायड्रोथेरेपी सेंटर, हत्ती ट्रॅक व शेड, पर्यटन व शिक्षण केंद्र, कर्मचारी निवास, पर्यटन गॅलरी, पार्किंग व्यवस्था, देखरेखीचा टॉवर गॅलरी आणि पशुवैद्यकीय पथक यांचा समावेश असेल.माधुरीवाडा हा फक्त निवारा नसून, जखमी किंवा आजारी हत्तींना उपचार मिळण्याचे, त्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्याचे आणि त्यांच्या सन्मानाचे केंद्र ठरेल. या प्रकल्पामुळे नांदणी परिसरातील पर्यटनालाही चालना मिळणार असून, पश्चिम महाराष्ट्रातील हत्ती पुनर्वसन क्षेत्रात हा एक ऐतिहासिक टप्पा ठरेल.