नाशिक,
Nashik smart ration card छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान' अंतर्गत निफाड तालुक्यात एक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला गेला आहे. तालुक्यातील सोनेवाडी खुर्द हे गाव आता पहिले ‘ऑनलाइन रेशनकार्ड गाव’ म्हणून घोषित झाले आहे. गावातील दुर्गामाता महिला बचत गटाचे रास्तभाव दुकान या उपक्रमाचे केंद्र आहे, जिथे गावातील पात्र लाभार्थ्यांची माहिती डिजिटल पद्धतीने अद्ययावत करण्यात आली आहे.

या प्रणालीअंतर्गत Nashik smart ration card शिधापत्रिकांची ऑनलाइन नोंदणी, आधार संलग्नता आणि धान्य वितरणाची अंमलबजावणी पूर्ण झाली आहे. गावात एकूण १११ शिधापत्रिकाधारक आहेत, ज्यात ४५ सदस्य असलेल्या १२ अंत्योदय योजना शिधापत्रिका आणि ३७८ अन्न सदस्य संख्या असलेल्या प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिका यांचा समावेश आहे. परिणामी, गावातील एकूण लाभार्थी सदस्य संख्या ४२३ आहे.ई-शिधापत्रिकेच्या माध्यमातून डिजिटल युगात स्मार्ट रेशनकार्डच्या दिशेने पहिले पाऊल ठेवले गेले आहे. या प्रणालीमुळे व्यवहारात पारदर्शकता वाढली असून, धान्य वितरणाची नोंद रिअल टाइम पद्धतीने होत असल्याने लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे धान्य वेळेवर मिळण्याची खात्री निर्माण झाली आहे. तसेच माहिती अद्ययावत करणे, नाव दुरुस्ती करणे, सदस्य वाढवणे किंवा कमी करणे ही कामेही ऑनलाइन पद्धतीने सुलभ झाली आहेत.
डॉ. शशिकांत Nashik smart ration card मंगरुळे, प्रांताधिकारी, यांनी सांगितले की, "डिजिटल प्रणालीमुळे पारदर्शकता वाढते आणि नागरिकांचा शासनावरील विश्वास दृढ होतो. सोनेवाडी खुर्दने तालुक्यात एक आदर्श निर्माण केला आहे." तसेच निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे म्हणाले, "ई-शिधापत्रिकेबाबत जनजागृतीसाठी गावात हा उपक्रम राबविण्यात आला आहे. हे गाव इतर गावांसाठी आदर्श ठरेल."या नव्या प्रणालीमुळे महसूल समाधान शिबिर अभियानाच्या माध्यमातून गावपातळीवर विविध सेवा अधिक प्रभावी आणि पारदर्शक पद्धतीने पुरवल्या जात आहेत.