नितीन भुतडा यांचा जन्मदिन रक्तदानाने साजरा करणार

दिग्रस भाजपाचा संकल्प

    दिनांक :06-Mar-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
दिग्रस,
nitin-bhutada-birthday-blood-donation : भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांचा शनिवार, 7 मार्च जन्मदिन रक्तदान करून साजरा करण्याचा संकल्प भाजपाकडून घेण्यात आला असून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
 
y6March-Nitin-Bhutada
 
 
 
भाजपा दिग्रस शहराध्यक्ष अभय इंगळे यांच्या पुढाकारात भुतडा यांच्या जन्मदिन रक्तदान करून साजरा करण्याचा संकल्प घेण्यात आला होता. भाजपाच्या सर्व पदाधिकाèयांसह कार्यकर्त्यांनी याला संमती दिली. येथील लाठीवाला पेट्रोल पंपासमोर भाजपा कार्यालयात सकाळी 9 वाजता होणाèया रक्तदान शिबिरात प्रत्येकाने दोघांना सोबत घेऊन रक्तदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 
 
या शिबिराला प्रमुख अतिथी म्हणून भाजपा पुसद जिल्हाध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, भाजपा पुसद जिल्हा महामंत्री दत्ता रहाणे, माजी जिल्हाध्यक्ष महादेव सुपारे, भाजपा नगरसेवक लक्ष्मी रिखबचंद मेहता, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. गजानन निचत व जिल्हा कार्यकारणी सदस्य डॉ. विवेक भास्करवार प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन भाजपाकडून करण्यात आले आहे.