वर्धेतील तिघे अडकले युद्धात!

    दिनांक :06-Mar-2026
Total Views |
वर्धा, 
people-from-wardha-caught-in-the-war : वर्धा शहरातील तीन जण आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धात अडकले आहेत. त्यात एक दामप्त्य तर एक तरुणी आहे. त्यांना परत आणण्याची तयारी जिल्हा प्रशासन करत आहे.
 
 
 
kl;
 
 
 
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे आखाती देशांमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. विमान सेवा बंद झाल्यामुळे जिल्ह्यातील तीन जण तेथे अडकले आहेत. वर्धा येथील रहिवासी आणि मुंबईतील आयटी कंपनीत काम करणारी कल्याणी डेकाटे कार्यालयातीन कामाकरिता गेल्याने बहरीन येथे तर राजेश आणि किरण शाहू हे दाम्पत्य संयुक्त अरब अमिरातीमध्ये अडकलेले जोडपे आहेत.
 
 
कल्याणी डेकाटे ९ फेब्रुवारी रोजी पाच सहकार्‍यांसह ४२ दिवसांसाठी बहरीनला गेली होती. तिचा व्हिसा २४ मार्चपर्यंत वैध होता. तिचे वडील भास्कर डेकाटे यांनी जिल्हा प्रशासनाला याबद्दल माहिती दिली आणि तिला परत आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केला आहे. राजेश आणि किरण शाहू हे दाम्पत्य १० दिवसांपूर्वी संयुक्त अरब अमिराती (अबुधामी) येथे पर्यटनाकाला गेले होते. ते हॉटेलमध्ये सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले.
 
 
संयुत अरब अमिरातीमध्ये असलेल्या माझ्या पालकांनी त्यांना परत आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केला. तेव्हापासून आपण वडिलांसोबत आणि जिल्हा प्रशासनाशी सतत संपर्कात आहे. जिल्हा प्रशासनाने माझ्या पालकांना शनिवारी, ७ मार्च रोजी त्यांच्या मायदेशी परतण्याची अधिकृत माहिती दिली. जिल्हा प्रशासनाने या संदर्भात अमूल्य सहकार्य केले असल्याची माहिती, शुभम शाहू यांनी दिली.