दारूच्या नशेत पोलीसांच्या हाताचा चावा घेतला

    दिनांक :06-Mar-2026
Total Views |
पुणे
Baner Pune police incident, दारूच्या नशेत लोक काय करतील याचा नेम नसतो, अशी पुन्हा एक धक्कादायक घटना पुण्यात समोर आली आहे. बाणेर परिसरात भान हरपलेल्या २४ वर्षीय मानसी चंपलाल परिहार्या आणि तिच्या मित्रा २४ वर्षीय युवराज नीलेश परतानी यांनी बारमध्ये वादातून पोलीसांवर हल्ला केला. या घटनेनंतर दोघांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
 

Baner Pune police incident,  
३ मार्च ते ४ मार्च २०२६ या रात्री बाणेरमधील ‘एजंट जॅक’ या बारमध्ये पार्टीसाठी गेलेल्या जोडीदारांनी मद्यपानानंतर बारमध्ये कोणाशी तरी वाद केला. पोलिसांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु मानसी आणि युवराज यांनी पोलीसांशी हुज्जत घालणे सुरू ठेवले. सीसीटीव्ही फुटेज पाहण्याची मागणी करण्यात आल्यावर दोघांनी बारमध्ये गोंधळ उडवला.
यानंतर पोलिसांनी Baner Pune police incident, दोघांना अधिक चौकशीसाठी बाणेर पोलीस ठाण्यात नेले. तेथेही त्यांची अरेरावी सुरू राहिली. वैद्यकीय तपासणीसाठी नेण्याचे सांगितल्यावर मानसीने महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या युनिफॉर्मला हात लावला, शिवीगाळ केली आणि त्यांच्यावर चावा घेतला. त्याचवेळी युवराजने पोलीसांना धमकावले की, “तुमची नोकरी घालवून टाकीन.” मानसीने “मी सुसाईड करून तुमची नावे लिहून ठेवीन” अशी धमकी देऊन पोलीसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.बाणेर पोलीसांनी या प्रकरणात सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण आणि शिवीगाळ या गंभीर कलमांतर्गत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक पाथरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.परिसरातील रहिवाशांना या घटनेमुळे मोठा धक्का बसला असून, दारूच्या नशेत कायद्याला हाताशी धरणाऱ्या तरुणांवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. बार परिसरातील सुरक्षा वाढवण्याची तसेच पोलीसांची सजगता वाढवण्याची गरज याप्रकरणामुळे अधोरेखित झाली आहे.