पुणे,
Pune sexual assault murder, पुणे शहराला हादरवणारी घटना हडपसर–सासवड रस्त्यावरील दिवेघाटाच्या पायथ्याशी घडली आहे. एका अनोळखी महिलेचा निर्घृण खून करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
३ मार्च रोजी दिवेघाटाच्या पायथ्याशी एका अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळला होता. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. फुरसुंगी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि फुरसुंगी पोलीस तसेच गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा समांतर तपास सुरू होता.तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी प्रकाश बिभीषण माने (वय २९, रा. वडकी नाला, ता. हवेली, जि. पुणे) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी प्रकाश माने एका खाजगी कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करत आहे. ज्या परिसरात तो काम करत होता, तिथेच महिला काही दिवसांपासून फिरत होती आणि रस्त्याच्या कडेला झोपत होती.
चौकशीत समोर आलेल्या Pune sexual assault murder, माहितीनुसार, रविवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास आरोपीने दिवेघाटाच्या पायथ्याशी त्या महिलेला गाठले. त्याने तिच्यावर जबरदस्तीने शरीर संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. महिलेने विरोध केला, तर संतापलेल्या आरोपीने तिच्या डोक्यात दगड घातला आणि नंतर गळा आवळून तिचा खून केला.मयत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही, आणि पोलिसांच्या अंदाजानुसार तिचे वय सुमारे ३० ते ४० वर्षे आहे.ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. युनिट सहा चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड तसेच पोलीस कर्मचारी तानाजी देशमुख, प्रमोद टिळेकर, बाळासाहेब सकटे आणि त्यांच्या पथकाने आरोपीला अटक केली.