एसबीएल कंपनी स्फोटातील बळींची संख्या 20

- गंभीर जखमी आणखी एका महिलेचा मृत्यू

    दिनांक :06-Mar-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
sbl-company-blast : काटाेल तालुक्यातील राऊळगावातील एसबीएल एक्सप्लाेसिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटातील बळींची संख्या 20 झाली आहे. आज शुक्रवारी दुपारी स्फोटात भाजल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुर्गा सेवतकर असे मृत महिलेचे नाव आहे.
 
 

jk  
 
 
 
काटाेल तालुक्यातील राऊळगाव येथील एस बी.एल. इंडस्ट्रियल एक्सप्लाेसिव्ह मॅन्युफॅक्चरर कंपनीत रविवारी (1 मार्च) अचानक स्फोट झाला हाेता. कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात पहिल्या दिवशी 18 कामगारांचा मृत्यू झाला तर 24 जण जखमी झाले. दुसèयाच दिवशी एका गंभीर जखमी महिलेचा मृत्यू झाला हाेता. त्यानंतर आज ऑरेंज सिटी हाॅस्पीटलमध्ये उपचार घेत असलेल्या दुर्गा केशव सेवतकर (45) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे एसबीएल कंपनीतील स्फोटातील बळींची संख्या वाढून 20 झाली आहे.
 
जखमींची प्रकृती चिंताजनक
 
 
एसबीएल कंपनीतील स्फोटात गंभीर जखमी झालेल्यांपैकी काही महिलांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. आरेंज सिटी हाॅस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार, मयुरी धुर्वे (24) या 45 टक्के भाजल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्यावर ’ट्रॅकीओस्टाेमी’ करण्यात आली असून त्यांना सध्या व्हेंटिलेटर ठेवण्यात आले आहे. आम्रपाली अनिल काळसर्पे (36) या 55 टक्के भाजल्या असून त्यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यादेखील व्हेंटिलेटरवर आहेत. राेशनी उमाटे या 75 टक्के भाजल्या असून त्यांच्या पायाच्या फॅक्चरवर ’एक्स्टर्नल िफक्सेशन’ करण्यात आले आहे. 70 टक्के जळालेल्या सीमा विजय धुर्वे यांच्या छातीला गंभीर दुखापत झाली असून बरगड्यांना फॅक्चर झाले आहे. यासह अन्य रुग्णांचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.