ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरकरिता मिळाले दोन कोटी

मार्च अखेरपर्यंत खर्च करण्याची मुभा

    दिनांक :06-Mar-2026
Total Views |
नागपूर,
transit-treatment-center : वन्यजीवांवर उपचारासाठी सेमिनरी हिल्स येथे असलेल्या ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ ला गत चार महिन्यांपासून निधीची प्रतिक्षा असताना अर्थसंकल्पात दोन कोटीचा निधी देण्यात आल्याने वनसंवर्धन अधिकार्‍यांनी दिलासा व्यक्त केला आहे. मात्र हा निधी मार्च अखेरपर्यंत खर्च करण्यास मुभा आल्याने इतर प्रश्न निर्माण झाले आहे.
 

jlk 
 
प्रत्येक विभागाला मिळाला निधी
 
 
मुख्यत: नागपूर वन विभागाने ४ कोटी १७ लाख रुपयांच्या निधीची मागणी केली होती. त्यासंदर्भात प्रस्ताव पाठविण्यात आला होता. वन्यप्राणी अपंगालयाअंतर्गत हा निधी प्रत्येक विभागाला देण्यात आला असून एकूण १२ कोटी २० लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. ट्रान्झिट ट्रिटमेंट १२ बिबट्या, एक गर्भवती वाघिणी तसेच इतर वन्यजीव आणि पक्ष्यांच्या काळजीसाठी हा निधी उपयोगी ठरणार आहे.
 
निधी मिळाल्याने संकट टळले
 
 
वन्यजीवांवर उपचार आणि त्यांना नैसर्गिक अधिवास मिळवून देण्याच्या मुख्य उद्देशाने दहा वर्षांपूर्वी सेमिनरी हिल्स येथे ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ उभारले होते. वन्यप्राण्यांच्या अन्न आणि औषधांचा निधी रोखून ठेवल्याने दैनंदिन आहारासाठी काही वन्यजीवप्रेमींच्या मदतीवर अवलंबून राहावे लागले होते. मात्र, आता निधी मिळाल्याने संकट टळले तरी इतर प्रश्न कायम आहे.
 
 
प्राण्यांची काळजी घेता येईल
 
 
आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी नाममात्र निधी देण्यात आल्याने खर्च करणे एक मोठे आव्हान ठरणार आहे. ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर मध्ये सध्या १२ बिबटे, एक वाघिण, हरीण, मोर आणि इतर आहेत, ज्यांची काळजी आता योग्यरित्या होईल, असा विश्वास वन विभागाच्या अधिकारी डॉ.विनिता व्यास यांनी व्यक्त केला आहे.