पत्नीच्या आरोपांनंतर एकत्र दिसले विजय-त्रिशा!

    दिनांक :06-Mar-2026
Total Views |
हैद्राबाद,
Vijay-Trisha seen together तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि तमिळगा वेत्री कळघम पक्षाचे प्रमुख विजय अलीकडच्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या पत्नी संगीता सोर्नालिंगम यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याची बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या तब्बल सत्तावीस वर्षांच्या वैवाहिक आयुष्यावर पडदा पडण्याची चर्चा सुरू झाली. या अर्जात त्यांनी एका अभिनेत्रीशी संबंध असल्याचा आरोप केल्याने हा वाद अधिकच गाजू लागला आहे.
 

thalapar 
या पार्श्वभूमीवर विजय हे ५ मार्च रोजी चेन्नईमध्ये आयोजित एका विवाह समारंभात अभिनेत्री त्रिशा कृष्णनसोबत दिसल्याने पुन्हा एकदा चर्चेचे वारे जोरात वाहू लागले. दोघेही एकाच कार्यक्रमाला पोहोचल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले असून त्याचा चित्रफितीचा भाग सामाजिक माध्यमांवर वेगाने पसरत आहे. विवाह समारंभात विजय हातात फुलांचा गुच्छ घेऊन प्रवेश करताना दिसतात, तर त्यांच्या मागोमाग त्रिशा कार्यक्रमस्थळी पोहोचताना दिसते.हा समारंभ चित्रपट निर्मिती व वितरण व्यवसायाशी संबंधित असलेल्या कल्पना सुरेश यांच्या कुटुंबातील विवाह सोहळ्याचा स्वागत समारंभ होता. मंचावर विजय आणि त्रिशा यांनी नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा देत फुलांचे गुच्छ अर्पण केले आणि एकत्र छायाचित्रांसाठी उभे राहिले. पत्नीशी सुरू असलेल्या कायदेशीर वादानंतर विजय प्रथमच त्रिशासोबत सार्वजनिक कार्यक्रमात दिसल्याने या प्रसंगाकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले.