कारंज्यात कृउबाच्या विभाजनाची सभा पाच मिनिटांत गुंडाळली!

*विरोधकांची गळचेपी करण्याचा प्रयत्न फसला *संचालकानी धरले धारेवर

    दिनांक :06-Mar-2026
Total Views |
वर्धा, 
wardha-news : जिथं तालुका तिथं मुख्य बाजार समिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच निबंधकांकडे पत्र पाठवून अश्या बाजार समितीने तातडीने मासिक सभा घेऊन संचालक मंडळाचे मत जाणून घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्ह्यात कारंजा आणि आष्टी असे दोन तालुयाची एकच बाजार समिती असल्याने या बाजार समितीचे विभाजन केले जाणार आहे. मात्र, कृषी उत्पन्न बाजार समिती आष्टी व उपबाजार समिती कारंजा या दोन्ही वेगवेगळ्या होऊ नये, असा घाट आष्टी बाजार समितीच्या सत्ताधार्‍यांनी घेतला आहे. यासाठी बुधवारी आष्टी बाजार समिती कार्यालयात मासिक सभा पार पडली. मात्र, ही सभा पाच मिनिटांतच गुंडाळून विरोधकांची गळचेपी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अखेर संचालकांनी धारेवर धरत सत्ताधार्‍यांचा हेकेखोरपणा हाणून पाडला.
 
 
k
 
 
 
ही सभा १ वाजता सुरू झाली आणि अवघ्या पाच मिनिटांत आटोपून सभा आटोपल्याचे भाजपा संचालकांना सांगण्यात आले. अखेर भाजपाचे संचालक भुपेश बारंगे आणि शिंदे गटाचे संचालक नितीन दर्यापूरकर यांनी सत्ताधार्‍यांचा हेकेखोरपणा हाणून पाडला. महायुतीचे संचालक काही कारणस्थ पाच मिनिट मासिक सभेत उशिरा पोहचल्याने सत्ताधार्‍यांनी आपली मासिक सभेत पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. पाच मिनिटात तीन प्रश्न असलेली सभा अवघ्या पाच मिनिटांत गुंडाळली कशी, असा प्रश्न यावेळी उपस्थित केला. त्यानंतर सत्ताधार्‍यांनी विरोधकांचे मत जाणून घेऊन ठरावात नमूद केले. कृषी उत्पन्न बाजार समिती विभाजन होऊ नये यासाठी सत्ताधार्‍यांचा अट्टहास दिसून आला. दोन्ही बाजार समिती विभाजन झाल्यास दोन्ही तालुयातील जनतेला न्याय मिळेल. दोन्ही तालुयात सभापती, उपसभापती सोबत संचालक संख्या वाढ होऊन अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. रित जागेवर बेरोजगारांची नेमणूक होईल. दोन्ही तालुयातील बाजार समिती वेगवेगळ्या झाल्यास डबघाईस आलेल्या बाजार समिती उत्पन्नात वाढ होऊन विकासाला चालना मिळेल. मात्र, सत्ताधार्‍यांना खुर्ची लालसा असल्याने पद जाऊ नये या भीतीपोटी बाजार समितीचे विभाजन होऊ नये, असाच प्रयत्न करीत होते.
 
 
सत्ताधार्‍यांनी अवघ्या पाच मिनिटात मासिक सभा गुंडाळण्याचा प्रयत्न केला ही इतिहासातील ही पहिली घटना म्हणावी लागेल. मासिक सभेच्या पत्रात तीन प्रश्न होते. सोबतच मासिक सभा सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी १३ संचालक उपस्थित होते. त्यांच्या मासिक सभेच्या बुकावर सही घेण्यासाठी पाच मिनिटांचा वेळ लागतो. मग ही सभा पाच मिनिटांत समाप्त करण्याचं षडयंत्र सत्ताधार्‍यांनी केले. मात्र, तो षडयंत्र हाणून पाडला. अखेर आमचे मत त्या सभेत नोंदवण्यात आले. कारंजा-आष्टी बाजार समिती वेगवेगळ्या झाल्यास याचा फायदा दोन्ही बाजार समितीला होणार आहे. दोन्ही बाजार समिती वेगवेगळे व्हावी यासाठी पाच मतदान झाले. तर आष्टी बाजार समितीचे विभाजन होऊ नये यासाठी सत्ताधार्‍यांकडून १३ मतदान झाले, अशी प्रतिक्रीया आष्टी बाजार समितीचे संचालक भुपेश बारंगे यांनी तरुण भारतशी बोलताना दिली.