वटेघाट शाळेत वार्षिक सरस्वती पूजन उत्सव

    दिनांक :07-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Wateghat School जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वटेघाट येथे शाळेचे वार्षिक सरस्वती पूजन कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कुसुम कुंभरे आणि उपाध्यक्ष नीलम उईके प्रमुख उपस्थित होत्या. कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. सरस्वती पूजन अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे ज्ञानेश्वर डहाके सर आणि रमेश वैद्य उपस्थित होते, तसेच व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनीही कार्यक्रमास हजेरी लावली.
 
Wateghat School
 
ज्ञानेश्वर डहाके सर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले आणि यशस्वी होण्यासाठीचा मंत्र सांगितला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माया कुमरे, माला, गावातील महिला मंडळी, तसेच शाळेच्या शिक्षिका हेमलता चव्हाण आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहकार्य केले. Wateghat School कार्यक्रमाचे संचालन शाळेचे मुख्याध्यापक उज्वल रोकडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षिका हेमलता चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाची सांगता भारतीय पद्धतीच्या स्वादिष्ट जेवणासह करण्यात आली.
सौजन्य: उज्वला रोकडे, संपर्क मित्र