लातूरमध्ये भरधाव बीएमडब्ल्यूच्या धडकेत चार ठार!

    दिनांक :07-Mar-2026
Total Views |
लातूर,
BMW accident in Latur लातूर जिल्ह्यातील औसा शहराजवळ शुक्रवारी रात्री भरधाव बीएमडब्ल्यू कारने लाकडाने भरलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिल्यामुळे भीषण अपघात घडला. या घटनेत कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोन जखमी झाले आहेत. अपघात महामार्गावर रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास झाला. भरधाव कारने ट्रक आणि कंटेनरला मागून जोरदार धडक दिली, यामुळे लाकडाने भरलेला ट्रक शंभर फूट पुढे जाऊन उलटला, तर कार पूर्णपणे चक्काचूर होऊन रस्त्यालगत खड्ड्यात कोसळली.
 
 
 
save
 
सांगली येथील ही कार काही कामानिमित्त लातूरमध्ये आली होती. काम आटोपल्यानंतर शिवली येथे जेवण करून सहकाऱ्याला सोडण्यासाठी कार औशाकडे जात होती. अपघाताच्या वेळी कारमधील मृत्यू झालेल्यांमध्ये धनराज काशीनाथ जाधव (४९, रा. सांगली), आबासाहेब साळुंके (३६), शुभम शेषेराव पाटील (२६) आणि किसन रामलिंग साळुंके (४९, तिघेही रा. बोरगाव) यांचा समावेश आहे. गंभीर जखमी झालेल्या दोघांमध्ये जयहिंद विश्वास जाधव (३०, रा. औसा) आणि विनायक श्रीकांत हालदर (२८, रा. सांगली) यांचा समावेश आहे. धनराज जाधव हे सांगली येथील व्यापारी होते आणि बोरगाव येथील तरुणांच्या मदतीने औसा तालुक्यातील व्यवसायाचे जाळे तयार करत होते.