शिवजयंतीदिनी वन्यजीव रक्षणाची कृतीशील सेवा

    दिनांक :07-Mar-2026
Total Views |
हिंगणघाट,
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti तिथीनुसार साजर्‍या करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उबाठा गटाच्या वतीने वन्यजीव संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रवीण कडू यांचा सत्कार करण्यात. विशेष म्हणजे कडू यांनी त्याच दिवशी प्रत्यक्ष कृतीतून उत्तर देत एका मुया पक्षाला जीवदान दिले. स्थानिक सातेफळ मार्ग परिसरातील सुरेश बोकडे यांच्या घराच्या कंपाउंडमध्ये शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास एक छोटी काटेसायाळ आली. कुत्र्यांच्या भीतीने ती कंपाउंडमधील भिंतींच्या कोपर्‍यात अडकून बसली होती.
 


Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 
या घटनेमुळे बोकडे कुटुंबीय घाबरले होते. त्यांनी प्रवीण कडू यांना फोन करून माहिती दिली. माहिती मिळताच कडू यांनी घटनास्थळी धाव घेतली. अंधारात भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या त्या सायाळला सुरक्षितरीत्या पकडण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. काही वेळाच्या प्रयत्नानंतर तिला सुरक्षित पकडून जवळील मोकळ्या जागेत सोडण्यात आले.
सायाळ हा निशाचर व शाकाहारी Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti प्राणी असून तो प्रामुख्याने बिळात राहतो. गवत, पाने, फुले व झाडांच्या मुळांचा समावेश त्याच्या आहारात असतो. सायाळ काटे फेकून मारतो हा समाजातील गैरसमज असून ते काटे प्रत्यक्षात केराटीनपासून बनलेले कडक केस असतात, जे संरक्षणासाठी उपयोगी पडतात. शिवजयंतीदिनी वन्यजीव संरक्षण कार्यासाठी झालेल्या सत्कारानंतर त्याच दिवशी वन्यजीवाचे रक्षण करण्याची संधी मिळाल्याने हा दिवस अधिक अर्थपूर्ण ठरल्याची भावना प्रवीण कडू यांनी व्यक्त केली.