नागपूर
Dhangar Association धनगर अधिकारी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा नागपूरतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन रविवार, ८ मार्चला सकाळी ११.३० वाजता संत गजानन महाराज मंदिर सभागृह, बालाजी नगर, मानेवाडा रोड येथे करण्यात आले आहे.सामाजिक बांधिलकी जपत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसोबतच समाजाशी निगडित विविध विषयांवर काम करणाऱ्या संघटनेतर्फे हा पाचवा महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात अधिकारी, कर्मचारी, उद्योजक व व्यावसायिक महिलांचा सहभाग राहणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन सहायक आयुक्त कौशल्य विकास विभाग. नीता प्रफुल्ल औघड यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी प्रा. नलिनी ढोले राहतील. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉ. वर्षा ढवळे आणि सुनील खूंजनारे उपस्थित राहणार आहेत.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून Dhangar Association. निहारिका खोंदले, डॉ. नयना पाटील, डॉ. शोभना बिटे तसेच सीमा नन्होरे उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यात महिलांसाठी उद्योजकता मार्गदर्शन, आरोग्य मार्गदर्शन, आरोग्य तपासणी, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच उद्योजकांचे स्टॉल्स आयोजित करण्यात आले आहेत.कार्यक्रमाचे आयोजन अनुराधा थोटे व महिला आघाडी धनगर अधिकारी कर्मचारी संघटना करीत असून सर्व धनगर समाजातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे राज्याध्यक्ष अनिलकुमार ढोले व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
सौजन्य:उज्ज्वल रोकडे,संपर्क मित्र