एक वर्षांपासुन शेती साहित्यावर शेतकर्‍यांना सबसिडीची प्रतीक्षा!

महाराजस्व अभियान केवळ कुळाचार होऊ नये

    दिनांक :07-Mar-2026
Total Views |
विजय माहुरे

सेलू,
Farmer subsidy delay शासन आपल्या दारी ही योजना सरकार राबवित आहे. महाराजस्व अभियाना अंतर्गत विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येत असताना कृषी विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या वस्तूची सबसिडी वर्ष होऊनही खात्यात जमा झाली नसल्याने शेतकरी चिंतीत आहे.
 

Farmer subsidy delay  
कृषी विभागाच्या योजनाचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांना योजनेचा लाभ दिला जातो. सबसिडीची रक्कम जमा होईल या आशेने शेतकरी यंत्र सामुग्री विकत घेते. पण, एक वर्षाचा कालावधी लोटला असताना शेतकर्‍यांना सबसिडीची रक्कम मिळत नसेल तर शासनाची योजना कोणत्या कामाची असा प्रश्न शेतकर्‍यांनी उपस्थित केला आहे.
शेतकर्‍यांनी मागणी केल्या नंतर ते यंत्र तालुका कृषी विभागाच्या अधिकार्‍यांकडून मंजूर केल्या जाते. त्यानंतर शेतकर्‍यांना पूर्ण रक्कम दुकानदारांना द्यावी लागते त्यानंतर सबसिडीची रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. पण, एक वर्ष अधिक काळ जर यासाठी लागत असेल तर सबसिडीचा फायदा काय असा सवाल शेतकर्‍यांनी केला. शेतकर्‍यांना सबसिडीत ठिंबक सिंचन, तुषार सिंचन, पॉवर टिलर या वस्तू सवलतीची रक्कम लवकर मिळेल या आशेने खरेदी केल्या. अनेक शेतकर्‍यांना योजनेचा लाभ मिळाला खरा पण सवलतीची रक्कम मिळाली नसल्याने त्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे.
सबसिडीचे पैसे का आले नाही म्हणून शेतकरी सेलू तालुका कृषी विभागाच्या कार्यालयात उंबरठा झिजविताना दिसत आहे. सततच्या नापीकी मुळे त्रस्त असताना या वस्तू घेताना एकमुस्त रक्कम तर मोजली पण पुढे काय असा प्रश्न पडला आहे.
योजना शेतकरी हिताची तरी....
शासन महाराजस्व Farmer subsidy delay  अभियान राबवित आहे याचा मोठा गाजावाजा केला जात आहे. पण, उपेक्षित असणार्‍याकडे लक्ष या अभियानात गेले नाही. योजना शेतकरी हिताची असली तरी त्याची सवलतीची रक्कम जर शेतकर्‍यांना वर्ष उलटूनही बँकेच्या खात्यात जमा झालीच नसेल तर या योजनेचे फलित काय असा प्रश्न शेतकर्‍यांनी उपस्थित केला.