हिंदू समाजाने कौटुंबिक व सामाजिक जागृती करणे आवश्यक

    दिनांक :07-Mar-2026
Total Views |
कुरखेडा,
Hindu Sammelan Kurkheda Gadchiroli, हिंदू संमेलनात सहभागी झालेल्या हजारो हिंदू बांधवांना हिंदू संस्कृतीचे महत्त्व पटवून देताना सर्व हिंदूंनी जातिभेद, पंतभेद न मानता आम्ही सर्व हिंद आहोत या भावनेतून संघटित होऊन कौटुंबिक व सामाजिक एकता जोपासावी हीच एकता आपल्याला राष्ट्र सर्वतोपरी या दिशेने नेत असते, असे प्रतिपादन ह भ. प. विनोद बिहारी गोस्वामी महाराज यांनी केले.
 

Hindu Sammelan Kurkheda Gadchiroli, 
सकल हिंदू समाज मंडळ कुरखेडा यांच्या वतीने हिंदू जागृतीला नवी दिशा देण्यासाठी, सनातन संस्कृती, सनातन धर्म व सामाजिक एकतेच्या दृढतेसाठी 1 मार्च रोजी हनुमान मंदिर कुरखेडा येथून शोभायात्रेला सुरुवात होऊन कुरखेडा शहरातून मार्गस्थ होत भजन दिंडी पताका, कलश यात्रा, आदिवासी नृत्य, छत्रपती शिवाजी महाराज व राणी लक्ष्मीबाई अशा विविध झाक्यांच्या माध्यमातून हिंदू संस्कृतीची परंपरा व एकतेचे दर्शन दिले. या शोभायात्रेचा समारोप श्रीराम मंदिर कुरखेडा येथे करण्यात आला. त्यानंतर श्रीराम नगर येथील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन कार्यक्रमस्थळी धर्म ध्वजारोहण व गोमाता पूजन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर हरिभक्त परायण पंडित विनोद बिहारी गोस्वामी महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जोशी, पंडित द्वारकाप्रसाद मिश्रा महाराज, हरिभक्त परायण अविनाश दुबे महाराज उपस्थित होते.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक जोशी यांनी संघाची स्थापना, व्यक्ती निर्माणची कार्यपद्धती, संघाच्या कामाचा विस्तार सेवा कार्य स्पंच परिवर्तन सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, कुटुंब प्रबोधन,स्व आधारित जीवन नागरिक कर्तव्य या संदर्भात हिंदू बांधवांना मार्गदर्शन केले.
यावेळी शोभायात्रेत Hindu Sammelan Kurkheda Gadchiroli, विविध ठिकाणी सरबतचे वितरण करण्यात आले. कलश यात्रेमध्ये मोठ्या संख्येत महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या. हिंदू संमेलन आयोजन समितीच्या वतीने महाप्रसाद व भजन जागरणाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिभक्त परायण अविनाश दुबे महाराज यांनी केले. संचालन व आभार प्रा. विनोद नागपूरकर यांनी केले.यावेळी भारत मातेची आरती करण्यात आली. यावेळी माजी आमदार कृष्णा गजबे, वामनराव फाये, पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, भाग्यवान खोब्रागडे, चांगदेव फाये, जीवन पाटील नाट, रवींद्र गोटेफोडे, पंडित द्वारकाप्रसाद मिश्रा महाराज, आशिष काळे, वारकरी माळकरी, टाळकरी व विविध संप्रदायातील हिंदू बांधव मोठ्या संख्येत सहभागी झाले होते. तसेच कुरखेडा तालुक्यातील संत महंत या मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत भव्य हिंदू संमेलन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आयोजन समिती कुरखेडा मंडल यांनी विशेष सहकार्य केले.