ज्योतिबा माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिन सोहळा संपन्न

    दिनांक :07-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Jyotiba Secondary School लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्था संचालित ज्योतिबा माध्यमिक विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज, नंदनवन येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून तरुण भारतच्या पदाधिकारी गौरी सरनाईक तसेच पोलीस उपनिरीक्षक उर्मिला पोहणे आणि शीला मॅडम उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना स्त्रीशक्तीचे महत्त्व, शिक्षणाची ताकद आणि समाजात महिलांची वाढती भूमिका याबाबत मार्गदर्शन केले.

go 
 
 
यावेळी विद्यार्थ्यांनी भारतातील महान महिलांची वेशभूषा साकारत त्यांच्या कार्याचा परिचय करून दिला. लता मंगेशकर, इंदिरा गांधी आणि मदर तेरेसा यांच्या वेशात विद्यार्थ्यांनी रंगतदार सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली.प्राचार्या अरुणा कडू यांनी स्त्रीशक्तीवर आधारित प्रेरणादायी कविता सादर करून विद्यार्थ्यांना काव्यमय मार्गदर्शन केले. काJyotiba Secondary School र्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पर्यवेक्षक श्री वांदे, श्री चोपडे तसेच सर्व शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले.या प्रसंगी महिला पालकांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच महिला मेळाव्याचे आयोजन करून विविध खेळ व स्पर्धांमधून महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जैन यांनी केले.
सौजन्य:प्रा.अरुणा कडू ,संपर्क मित्र