केशव मौर्य यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग!

    दिनांक :07-Mar-2026
Total Views |

keshav maurya
 
लखनौ,
Keshav Maurya's helicopter lands उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्ययांच्याबाबत एक महत्त्वाची घटना समोर आली आहे. ते आज लखनौहून कौशांबी जिल्ह्याकडे प्रवास करत असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळाली. या बिघाडामुळे उड्डाण सुरू असतानाच खबरदारीचा उपाय म्हणून हेलिकॉप्टरचे तातडीने लखनौ येथील विमानतळावर सुरक्षित उतरवण्यात आले.अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वैमानिकांनी तत्परता दाखवत योग्य वेळी निर्णय घेतल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. हेलिकॉप्टर सुरक्षितपणे खाली उतरवल्यानंतर सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे स्पष्ट झाले. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनाही कोणतीही दुखापत झाली नसून ते पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेनंतर हेलिकॉप्टरमध्ये नेमका कोणता तांत्रिक बिघाड झाला होता, याबाबत तपास करण्यात येत असून संबंधित यंत्रणांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.