मुंबई,
Maharashtra's sting in UPSC केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०२५ च्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर केला असून, राजस्थानच्या डॉ. अनुज अग्निहोत्री यांनी देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या निकालामुळे महाराष्ट्राचा झेंडा डौलाने फडकला असून राज्यातील ६० हून अधिक उमेदवार यशस्वी झाले आहेत.कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरचे ऋषिकेश आलासे यांनी ६१ वा रँक मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. पहिल्या शंभर क्रमांकात महाराष्ट्राचे पाच उमेदवार आहेत.
राज्यातील यशस्वी झालेल्यांमध्ये ऋषिकेश आलासे (६१), आकाश त्रिवेदी (७३), गौरव चोपडा (८३), सायली पगार (८७), दीक्षा पाटकर (८८) या उमेदवारांचा समावेश आहे. याशिवाय अंकिता पाटील (१४०), आदित्य उपाध्ये (१५४), कार्तिक बच्छाव (१७७), उत्कर्ष पाठक (१७९), आदित्य पाठक (१८९) आणि प्रतीक जोशी (१९६) यांसारखे अनेक विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्याचे भिकन जगन रोजेकर यांनी ८१२ वी रँक मिळवली असून त्यांना आयपीएस कॅडर मिळण्याची शक्यता आहे. भिकनचे वडील शेतकऱ्यांकडे कामाला गेलेले शेतमजूर आहेत आणि आईही शेतात मजुरी करतात. दोघेही निरक्षर असूनही त्यांनी मुलांच्या शिक्षणात कुठेही कमी पडू दिले नाही. या निकालामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून राज्यातीलयूपीएससी परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा क्रम वाढत चालला आहे.