अनिल कांबळे
नागपूर,
vehicles breakdown पाचपावली पाेलिसांनी ठाण्यांतर्गत स्वामीनगर व ठक्करग्राम परिसरात वाहनांची ताेडफफाेड करून दहशत निर्माण करणाऱ्या 4 आराेपींना अटक केली. कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या या आराेपींना धडा शिकवण्यासाठी पाेलिसांनी त्यांची परिसरातून ‘धिंड’ काढत गुन्हेगारांना कायद्याशी खेळू देणार नसल्याचा कठाेर इशारा दिला. यश उर्फ यशू कसार, तुषार उर्फ पित्तू किरण पराते, ऋतिक ढाेके आणि लक्की पांडे (सर्व रा. ठक्करग्राम, नंदगिरी राेड) अशी अटकेतील आराेपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ठक्करग्राम परिसरात काही आराेपींनी हैदाेस घालत घराबाहेर उभ्या वाहनांची ताेडफफाेड केली आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले हाेते. घटनेची माहिती मिळताच पाचपावलीचे ठाणेदार बाबुराव राऊत पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि तातडीने तपास सुरू केला. तपासादरम्यान पाेलिसांच्या हाती काही सीसीटीव्ही ुटेज लागले. या फुटेजच्या आधारे पाेलिसांनी आराेपींचा शाेध घेऊन वरील चारही आराेपींना अटक केली. त्यांचे काही साथीदार फरार असून पाेलिस त्यांचाही शाेध घेत आहेत.vehicles breakdown त्यानंतर पाेलिसांनी नागरिकांतील भीती दूर करण्यासाठी आणि गुन्हेगारांना कठाेर इशारा देण्याच्या उद्देशाने आराेपींनी ज्या भागात दहशत निर्माण केली हाेती त्याच भागातून त्यांची ‘धिंड’ काढली. चारही आराेपींना पायी स्वामीनगर, नंदगिरी राेड, ठक्करग्राम, माेचीपुरा आणि खाटीकपुरा परिसरात फरवण्यात आले. या वेळी काेणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी माेठा पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात आला हाेता. शहरातील कायदा व सुव्यवस्थेशी छेडछाड करणाऱ्यांना काेणतीही सूट दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पाेलिसांनी दिला आहे.
.......