शतिपीठसाठी लवकरच जमीन अधिग्रहण प्रक्रिया; ५ पट मोबदला

संयुत मोजणी अहवाल एमटीडीसीला सादर

    दिनांक :07-Mar-2026
Total Views |
वर्धा,
Shaktipeeth Expressway land acquisition,  विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गोवा राज्याशी जोडणारा पवनार ते सिंधूदुर्ग मधील पत्रादेवी असा ८०२ किमीचा शक्तिपीठ महामार्ग राज्य सरकारचा महत्त्वाकांशी प्रकल्प आहे. हा मार्ग वर्धा जिल्ह्यातील २ तालुयातून जात आहे. या महामार्गासाठी जिल्ह्यातील २० गावांतील जमीन संपादीत केली जाणार आहे. जमीन मोजणी होऊन वर्धा उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयाला जमिनीचा संयुत मोजणी अहवाल (जेएलएसआर) सादर झाल्याने आणि तो एमएसआरडीसीकडे पाठविण्यात आल्याने आता भूसंपादना विषयी मार्गदर्शक सुचनाची प्रतीक्षा जिल्हा प्रशासनाला आहे. या रस्त्यासाठी ज्या शेतकर्‍यांची शेती जाणार आहे त्यांना बाजारभावापेक्षा ५ पट जास्त पैसे मिळणार आहेत.
 
 
 

Shaktipeeth Expressway land acquisition,   
शक्तिपीठ महामार्ग हा १२ जिल्ह्यातील ३९ तालुके, ३७१ गावांच्या हद्दितून जाणार आहे. त्यासाठी राज्यातील सुमारे ८ हजार ६१५ हेटर जमीन संपादित Shaktipeeth Expressway land acquisition,  केली जाणार आहे. हा महामार्ग वर्धा तालुयातील दहा व देवळी तालुयातील दहा गावांतून जाणार आहे. त्यासाठी ४८६.७८९ हेटर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. महामार्गासाठी लागणार्‍या जमिनीची मोजणी भूमि अभिलेख विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. पण सुरुवातीला जमिनीचा संयुक्त मोजणी अहवाल जबाबदार अधिकार्‍यांनी वर्धा उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयात सादर केला नव्हता. तो अलिकडेच सादर झाल्यावर पुढील कारवाईसाठी एमएसआरडीसीला सादर करण्यात आला आहे. याच पृष्ठभूमीवर अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्गाचा उल्लेख केला. त्यामुळे लवकरच किमान विदर्भात तरी या महामार्गासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती मिळेल अशी आशा पल्लवीत झाली आहे. विशेष म्हणजे शक्तिपीठ महामार्गासाठी जी जमीन संपादित केली जाणार आहे त्या जमीनधारकाला बाजार भावाच्या ५ पट मोबदला मिळणार आहे.
वर्धा तालुका
 
 
गावे : १०
 
शासकीय : ७.३४८६ हेटर
खासगी : २५६.३१५० हेटर
एकूण : २६३.६६३६ हेटर
देवळी तालुका
गावे : १०
शासकीय : ९.७३५६ हेटर
खासगी : २३०.४७४० हेटर
एकूण : १४०.२०९६ हेटर