बंद शिप्रा उद्योग परिसरात आग

    दिनांक :07-Mar-2026
Total Views |
वर्धा
Shipra Industries fire, सेवाग्राम मार्गावरील औद्योगिक वसाहत परिसरातील बंद असलेल्या शिप्रा उद्योग परिसरात आज शनिवार ७ रोजी सकाळी आग लागली. दोन तासांच्या शर्तीच्या प्रयत्नाअंती वर्धा नगर पालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला.
 

Shipra Industries fire, 
एमआयडीसी परिसरात वैद्य यांच्या मालकीची शिप्रा कंपनी अनेक वर्षांपासून आहे. आज शनिवार सकाळी १० वाजताच्या सुमारास याच कंपनीच्या परिसरात आग लागल्याचे काहींच्या निदर्शनास आल्यावर तातडीने वर्धा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. Shipra Industries fire, आगीनेही परिसरातील कचरा व काही वेस्ट मटेरियल कवेत घेत रौद्ररूप धारण केल्याने एकच खळबळ उडाली होती. माहिती मिळताच वर्धा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळ गाठले. पाण्याचा मारा करून सुमारे दोन तासानंतर आग विझविण्यात अग्निशमन विभागाच्या जवानांना यश आले. आग नेमकी कशामुळे लागली हे वृत्तलिहिस्तोवर कळू शकले नाही.