शिक्षक संघटना समन्वयात कर्मचार्‍यांची कानउघाडणी

शिक्षकांची कामं प्रलंबित ठेवणार्‍यांना दिली तंबी

    दिनांक :07-Mar-2026
Total Views |
समुद्रपूर,
Teacher association, दोन तीन वर्षांपूर्वी दुसर्‍याच्या नावाने वेतन काढल्याचा प्रकार अद्याप शिक्षण क्षेत्र विसलेले नसताना मागील एक ते दीड वर्षापासून नवीनच समस्यांचे ग्रहण लागले. या विभागातील काही शिक्षकांची कामे ठप्प ठेवत असल्याचे समन्वय सभेत उघड झाल्यानंतर अधिकार्‍यांनी संबंधीत कर्मचार्‍यांना चांगलेच खडसावत तंबी दिली.
 

Teacher association, employee inquiry, 
या कार्यक्रमात जिल्हा परिषदेतील संबंधित विभागातील काही कर्मचारी सुद्धा सहभागी असल्याची शंका यावेळी संघटना प्रतिनिधींनी उपस्थित केली. गटविकास अधिकारी सतीश टिचकुले यांनी ५ रोजी घेतलेल्या सभेत गटशिक्षणाधिकारी अशोक गिदेवार यांचेसह सहाय्यक प्रशासन अधिकारी नरेंद्र पाटील, क.प्र.अ. नरेश वानकर, शिक्षण विभागातील कर्मचारी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सेवानिवृत्ती प्रकरणे, गटविमा प्रकरणे, अंतिम भविष्य निर्वाह निधी प्रकरणे, वेतनश्रेणी प्रकरण, सेवापुस्तक अद्यावत करणे, सेवापुस्तिकेत सेवाविषयक, वेतनवाढ आणि विम्याच्या नोंदी घेण्याची प्रकरण, वेतन पडताळणी प्रकरण, भविष्य निर्वाह निधी अग्रिम प्रकरण, पदवीधर शिक्षकांचे सुधारीत वेतन निश्चिती, अर्जित रजा मंजुरी प्रकरण, वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रकरण यासारखी अनेक कामे प्रलंबित ठेवत होते. विशेष म्हणजे कामे असणार्‍या शिक्षकांना मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार याच दिवसाला कार्यालयात बोलाविले जायचे. या बाबत या अगोदर सुद्धा शिक्षकांनी विभागाला कळविले. परंतु, संबंधित कर्मचार्‍यांना पत्र देण्याच्या पलीकडे कुठलीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे दोन्ही कर्मचार्‍यांचे मनोबल वाढत गेले, असा आरोप शिक्षक संघटना प्रतिनिधींनी सभेत केला.
अखेर संघटना समन्वय सभेत प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष अजय गावंडे यांनी पुराव्यासह त्या दोन्ही कर्मचार्‍यांच्या कार्यशैलीचा सभेत पाढाच वाचला. सर्व प्रकार उघड होताच प्रशासनिक अधिकारीही स्तब्ध झाले. गटविकास अधिकार्‍यांनी दोनही कर्मचार्‍यांची कानउघाडणी करीत कडक तंबी दिली.
 
यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे गणेश शेंडे, स्वतंत्र समता शिक्षक संघाचे सुनील तेलतुंबडे, सचिन शंभरकर, विक्रम तमागाडगे, श्रीधर घोडमारे, उपस्थित होते.
 
दोन्ही कर्मचार्‍यांना प्रथम कारणे दाखवा नोटीस देऊन पुढील कारवाई करण्यात येईल तसेच पुढील आढावा सभेत प्रलंबित प्रश्न पूर्ततेचा आढावा घेण्यात येईल असे गटविकास अधिकार्‍यांनी सांगितले.