UPSCमध्ये 301व्या रँकवर दोन उमेदवारांचा दावा

यूपी आणि बिहारच्या ’आकांक्षा सिंह’ यांचे समान रोल नंबर

    दिनांक :07-Mar-2026
Total Views |
 नवी दिल्ली  
 UPSC नागरी सेवा परीक्षा 2025 च्या निकालात एकाच रँकवर दोन उमेदवारांनी दावा केला आहे. UPSCने जारी केलेल्या गुणवत्ता यादीत अखठ 301 वर आकांक्षा सिंह आहेत, ज्यांचा रोल नंबर 0856794 आहे. या निवडीवर बिहार आणि यूपीमधून 2 वेगवेगळ्या विद्यार्थिनींनी दावा केला आहे. या दोन्ही उमेदवारांचे नाव आकांक्षा सिंह आहे.
 
 
upsc result
 
बिहारच्या आकांक्षाच्या प्रवेशपत्रात गडबड
प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन्ही उमेदवारांचे प्रवेशपत्र तपासले. यूपीच्या गाझीपूरच्या आकांक्षाच्या मुलाखतीच्या कॉल लेटरवर नोंदवलेला रोल नंबर 0856794 आहे. या प्रवेशपत्रावर दिसणारा क्यूआर स्कॅन केल्यावरही तोच रोल नंबर दिसत आहे.
तर, बिहारच्या आरा येथील आकांक्षा सिंहने माध्यमांना आपले पूर्वपरीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले. मात्र, यावरही रोल नंबर 0856794 असाच लिहिलेला दिसत आहे. पण क्यूआर  स्कॅन केल्यावर रोल नंबर 085659 दिसत आहे.
अशा परिस्थितीत, एकतर upsc कडून प्रवेशपत्र जारी करण्यात काहीतरी गडबड झाली आहे, किंवा बिहारच्या आकांक्षाच्या प्रवेशपत्रात छेडछाड करण्यात आली आहे. या प्रकरणी upsc कडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.