१४ वर्षांनंतर पीडितेची सुटका; जबरदस्ती धर्मांतरण व छळाचा गंभीर आरोप

    दिनांक :07-Mar-2026
Total Views |
मथुरा,
mathura conversion case उत्तर प्रदेशातील मथुरा येथे घडलेल्या एका धक्कादायक प्रकरणात, १४ वर्षांपूर्वी अपहरण झालेल्या एका तरुणीची अखेर सुटका झाली असून तिने पुन्हा आपल्या कुटुंबासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दीर्घकाळ कट्टरपंथीयांच्या तावडीत अडकल्यानंतर ती बाहेर पडल्याचे समोर आले आहे.
 

लव्ह जिहाद  
 
 
पीडित तरुणीने पोलिसांकडे दिलेल्या माहितीनुसार, २०१२ साली ती मथुरामधील एका संस्थेत अभ्यासासाठी जात असताना तिचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी गोविंद नगर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
तरुणीच्या म्हणण्यानुसार, अभ्यासक्रमादरम्यान तिची एका तरुणाशी ओळख झाली होती. त्या व्यक्तीने हिंदू नाव वापरून तिच्याशी मैत्री केली आणि नंतर प्रेमसंबंधांच्या माध्यमातून तिला जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला बिहारमध्ये नेण्यात आले, असा आरोप पीडितेने केला आहे.
पीडितेच्या आरोपानुसार, बिहारमध्ये नेल्यानंतर तिच्यावर जबरदस्तीने धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. या काळात तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. तिच्या गळ्यातील भगवान श्रीरामाचे लॉकेट तोडून फेकण्यात आल्याचा आरोपही तिने केला आहे. तसेच धर्मांतरानंतर तिला जबरदस्तीने गोमांस खाण्यास भाग पाडल्याचेही तिने सांगितले. याशिवाय तिला वेश्याव्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप पीडितेने केला आहे.
दरम्यान, पीडित तरुणीने कशीतरी फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून महाराणा प्रताप सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजवर्धन परमार आणि सर्वोच्च न्यायालयाचे वकील ए.पी. सिंह यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या प्रयत्नांमुळे तिची सुटका करण्यात यश आल्याचे सांगितले जात आहे.
सुटका झाल्यानंतर पीडितेने पुन्हा हिंदू धर्मात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी तिने पोलिसांकडे केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.