आज पालकमंत्री नारी शक्ती सन्मान सोहळा

अंगणवाडी सेविका, मदतनीसांचा कला व सांस्कृतिक महोत्सव

    दिनांक :07-Mar-2026
Total Views |
वर्धा,
Women's Day celebration जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार ८ रोजी पालकमंत्री नारी शक्ती सन्मान सोहळा तसेच अंगणवाडी सेविका, मदतनिसांच्या कला व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन चरखा सभागृह सेवाग्राम येथे सकाळी १०.३० वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नारी शक्तीचा गौरव तसेच विविध कला व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
 



Women 
कार्यक्रमाचे उद्घाटक तथा अध्यक्ष म्हणून पालकमंत्री डॉ. पंकज भोयर राहतील तर खा. अमर काळे, आ. दादाराव केचे, आ. अभिजित वंजारी, आ. सुधाकर अडबाले, आ. समीर कुणावार, आ. राजेश बकाने, आ. सुमित वानखेडे, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, गिमाटेसच्या संचालक प्रेमलतादेवी मोहोता, एमआयटी पुणेच्या विश्वस्त प्रा. स्वाती कराड-चाटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले यांची प्रामुख्याने उपस्थिती राहिल. सायंकाळी ७.३० वाजता कला व सांस्कृतिक महोत्सवाचे बक्षीस वितरण व समारोप होणार आहे.