नागपूर,
Youth Empowerment Campaign अंत्योदय मिशनच्या वतीने “युवा सक्षमीकरण अभियान – २०२६” या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. ग्रामीण भागातील युवकांना शिक्षण, स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्व विकास आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने या अभियानाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. देवेंद्र भोंगाडे होते, तर उद्घाटक म्हणून यशोधरा बहुउद्देशीय संस्था, नागपूरचे कार्यकर्ते तनवीर मिर्झा उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून गणेश चोंडेकर तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून निलेश जीभकाटे, टास्क फोर्सचे समन्वयक डॉ. योगेश सरोदे आणि सदानंद गिरडे उपस्थित होते. युवा सक्षमीकरण अभियानाचे अध्यक्ष समय मिश्रा यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी रेणुका वसाडे यांनी प्रास्ताविकातून अभियानाची भूमिका व उद्दिष्टे स्पष्ट केली. यावेळी व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.Youth Empowerment Campaign नेहा ढोरे व मानसी सावरकर यांनी मनोगत व्यक्त केले. निवेदिता तायवाडे यांनी अभियानाची वार्षिक कार्ययोजना सादर केली.उद्घाटक तनवीर मिर्झा यांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबन, मोठी स्वप्ने आणि कठोर परिश्रमाचे महत्त्व पटवून दिले. अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. देवेंद्र भोंगाडे यांनी या अभियानातून स्वावलंबी व जबाबदार युवक घडविण्याचा उद्देश असल्याचे सांगितले.
दुसऱ्या सत्रात स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन या विषयावर गणेश चोंडेकर तसेच कौशल्य विकास व रोजगाराच्या संधींवर श्री निलेश जीभकाटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. Youth Empowerment Campaign “आजचा युवक आणि सामाजिक दायित्व” या विषयावर गटचर्चाही घेण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन . रीतिका माथुरकर यांनी केले, तर कु. संचिता सोनोले यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या आयोजनात रोहन माथुरकर यांनी संयोजक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. अभियानाचे सुमारे साडेचारशे नोंदणीकृत सदस्य असून ७२ विद्यार्थ्यांची कार्यकारिणी व १५ विद्यार्थ्यांची व्यवस्थापन समिती कार्यरत आहे.
सौजन्य:तेजेंद्र गिरडे,संपर्क मित्र