यवतमाळ,
शहरातील सांस्कृतिक परंपरेचे एक महत्त्वपूर्ण केंद्र असलेल्या नाट्यगृहाची Municipal Council Adv. Priyadarshini Uike नगर परिषद अध्यक्ष अॅड. प्रियदर्शनी उईके यांनी भेट देऊन पाहणी केली. या भेटीदरम्यान नाट्यगृहातील विविध सुविधा, प्रेक्षकांची आसनव्यवस्था, स्वच्छता, प्रकाशयोजना, ध्वनीव्यवस्था तसेच कलाकारांना उपलब्ध असलेल्या ‘बॅकस्टेज’ सुविधांचा घेण्यात आला.
यवतमाळ शहरातील सांस्कृतिक, सामाजिक व कलात्मक कार्यक‘मांना प्रोत्साहन देण्यासाठी हे नाट्यगृह अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. शहरातील कलाकार, नाट्यप्रेमी आणि विविध सांस्कृतिक संघटनांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध व्हावे. यासाठी नाट्यगृहातील आवश्यक सुधारणा व सोयी-सुविधा अधिक सक्षम करण्याबाबत संबंधित अधिकार्यांशी चर्चा करण्यात आली. शहरातील कला, संस्कृती आणि नाट्यपरंपरेला चालना नगर परिषद सदैव कटिबद्ध असून, भविष्यातही अशा सांस्कृतिक स्थळांचा विकास करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असे आश्वासन यावेळी Municipal Council Adv. Priyadarshini Uike नप अध्यक्ष अॅड. प्रियदर्शनी उईके यांनी दिले.