हिंगणघाट,
Automobile fire in Hinganghat शहरातील कैलास सांयकार यांच्या ऑटोमोबाईल्स व वाहन दुरुस्ती दुकानाला भीषण आग लागली. या आगीत वाहन दुरुस्तीचे साहित्य जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक आहे. ही घटना आज रविवार ८ रोजी दुपारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार ११२ चे पथक शहरात गस्त घालत असताना ही आग त्यांच्या निदर्शनास आली. पथकप्रमुख प्रवीण बोधाने व स्वप्निल जीवने यांनी नगरपरिषद हिंगणघाट अग्निशामक दलाचे प्रमुख गौरव गाणार व सुनील डोळस यांना माहिती दिली. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाटच्या अग्निशामक दलालाही तातडीने पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या बंबाने केलेल्या पाण्याच्या मार्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
Automobile fire in Hinganghat दरम्यान, दुकानाच्या मागील भागात अज्ञाताने कचरा पेटविल्याचे दिसून आले. त्यामुळेच आग लागल्याची शयता वर्तविण्यात येत आहे. मात्र, आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. . नगरपरिषद हिंगणघाट अग्निशामक दलाचे अधिकारी गौरव गाणार यांच्या मार्गदर्शनात सुनील डोळस, होम लडी, किशोर मुंजेवार व वैभव ऐलगंदेवार तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अग्निशामक दलातील विनोद मंडलवार, वैभव मात्रे, आकाश महल्ले, राहुल कोटफळे व महेश चेनेवार यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.