बोर व्याघ्रत १० प्रजातींच्या गरुडांची नोंद

    दिनांक :08-Mar-2026
Total Views |
वर्धा,
Bore Tiger Reserve, जैवविविधतेने नटलेला बोर व्याघ्रप्रकल्प वाघ, बिबट या मांस भक्षी शिकारी प्राण्यांच्या संवर्धनासाठी उपयुत ठरत आहे. या बोर व्याघ्र प्रकल्पात सुमारे ४५ प्रजातींच्या शिकारी पक्ष्यांचा अधिवास असून त्यात दहा प्रजातींच्या गरुडांचा समावेश असल्याची नोंद घेण्यात आली आहे.
 

 Bore Tiger Reserve, 
सेलू तालुयातील बोर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांना भुरळ घालतो. व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव विभागाच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या विशेष सर्वेक्षणात २५७ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद घेण्यात आली आहे. यात प्रामुख्याने ४५ प्रजातींच्या शिकारी पक्ष्यांचा समावेश असून त्यातही राखी डोयाची मस्त्य गरुड, आखुड बोटाचा सर्प गरुड, तुरेवाला सर्पगरुड, काळा गरूड, छोट्या ठिपयाचा गरुड, मोठ्या ठिपयाचा गरुड, नेपाळी गरूड, बोनेलीचा गरुड, सरडामार गरुड, मोरघार म्हणजेच हूम बाज किंवा व्याघ्र गरुड या १० प्रजातींच्या गरुडांचा समावेश आहे.बोर व्याघ्र प्रकल्पात विदर्भातील आणि विदर्भाबाहेरील पर्यटक जंगल सफारीसाठी येतात. पर्यटकांना या ठिकाणी वाघ, बिबट, अस्वल आदी प्राण्यांसह दुर्मिळ पक्ष्यांचेही दर्शन जंगल होत असल्याने निसर्गप्रेमी बोर व्याघ्र प्रकल्पाच्या जैवविविधता बघून भारावूनच जातात. जंगल सफारीसाठी येणार्‍यांनीही केवळ व्याघ्र दर्शनाची इच्छा मनात बाळगून जंगल सफारीचा आनंद लुटल्यापेक्षा बोरची जैवविविधता जंगल सफारीच्या माध्यमातून अनुभवावी असेही जंगल सफारीचा आनंद लुटणारे पर्यटक सांगतात.१३ हजार ८०० हेटर कोअर तर ६७ हजार ८१४.४६ हेटर बफर क्षेत्र असलेल्या सेलू तालुयातील बोर व्याघ्र प्रकल्पात २०२३ ते २०२५ या काळात विशेष सर्वेक्षणाअंती तब्बल १३१ प्रजातींच्या आरोही वनस्पती असल्याची नोंद घेण्यात आली आहे. तर या व्याघ्र प्रकल्पात सुमारे १८ पौढ वाघांसह बिबट, अस्वल असे तृण व मांस भक्षी वन्य प्राण्यांची संख्याही मोठी आहे.
बोर व्याघ्र प्रकल्प हा इतर व्याघ्र प्रकल्पांच्या तुलनेत क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान असला तरीही जैवविविधतेमुळे नाव लौकिकात मोठा ठरतो आहे. या ठिकाणी वाघ, बिबट, अस्वल व इतर सस्तन प्राण्यांसोबत फुलपाखरे, कीटक, पक्षी व सरपटणारे प्राणी मोठ्या प्रमाणात आढळून येतात. या जैवविविधतेकरिता अनुकूल असणारे अधिवास बोर व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात आहेत. ज्या मध्ये नद्या, जंगल व्याप्त तलाव, माळराने आदींचा समावेश असल्याची माहिती जीवशास्त्रज्ञ तथा बहार नेचरचे कार्यकारिणी सदस्य दर्शन दुधाने यांनी सांगितले.