बुलढाणा,
Buldhana ST bus concession card issue, एसटी महामंडळाची सवलत हवी असेल त्यांनी एनसीएमसी कार्ड (नॅशनल कॉमन मोबीलिटी कार्ड) ज्याला मराठीत राष्ट्रीय सामान्य गतिशीलता कार्ड असे संबोधले जाते ते आवश्यक असणार आहे. साहजीकच राज्यभरात कार्ड मिळविण्यासाठी झुंबड उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व आगारांमध्ये विद्यार्थी, दिव्यांग, महिला तसेच ज्येष्ठ नागरिक रांगेत लागत आहेत. आपलं काम झालं पाहीजे लवकर झालं पाहीजे या मनोभूमिकेतून १९९ रूपयांच्या कार्डसाठी ५०० रूपयांपर्यंत मोजण्याची काही जणांची तयारी असल्यामुळे दलालांचे फावत आहे. दुर्दैवाने एनसीएमसी कार्ड योजनेमध्ये दलालांचा शिरकाव झाला.
बुलढाणा आगारात एकच मशीन सुरु आहे. एसटी महामंडळाच्या नियंत्रणाबाहेर हे सर्व आहे. एनएसडीएल आणि एसजीआर कंपनीकडून कार्ड बनविण्यासाठी १४३ एजंटांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका आगारासाठी जवळपास १० एजंट काम करणार आहेत. परंतु प्रत्येक आगारामध्ये केवळ एकच मशीन सक्रिय आहे. जिथे दहा एजंटांनी दहा मशीनवर काम करायचे आहे तिथे एकच मशीन काम करत असल्यामुळे आगारामध्ये कार्ड मिळविण्यासाठी लोक एकमेव काऊंटरवर तुटून पडत आहे. येथे दोन कक्षाची गरज आहे.
१९९ रूपयांच्या कार्डसाठी दोनशे ते तीनशे रूपयांची लाच घ्यायची आणि कार्ड उपलब्ध करून द्यायचे. एनसीएमसी कार्डमध्ये दलालांचा मोठा सुळसुळाट झाल्याच्या राज्य परिवहन मंडळाचे विभागीय नियंत्रक तथा जिल्हाधिकरी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे. याशिवाय राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनीही याविरोधात आवाज उठविण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात जेष्ठ नागरिकांच्या वृत्तपत्रांकडे तक्रारी वाढल्या आहेत