सीए इंटरचा निकाल जाहीर

हरयाणाचा कन्हैयालाल देशात अव्वल

    दिनांक :08-Mar-2026
Total Views |
नवी दिल्ली, 
ca-inter-results-announced : इंडियन इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडिया अर्थात आयसीएआयच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सीए इंटर परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत हरयाणाच्या कन्हैया लालने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.
 
 
 
CA
 
 
 
सीए इंटर परीक्षा जानेवारी 2026 मध्ये झाली होती. या परीक्षेतील सर्व विद्यार्थी संकेतस्थळावर जाऊन निकाल पाहू शकतात. संकेतस्थळावर गुणवत्ता यादीही देण्यात आली आहे. या परीक्षेत देशात अव्वल ठरलेला कन्हैया लाल हरयाणातील एलेनाबादचा राहणारा असून त्याने 600 पैकी 508 अंक मिळवले आहेत. त्याच्या गुणांची टक्केवारी 84.67 टक्के इतकी आहे. दुसरे स्थान केरळच्या फातिमा शेहजाने मिळवले असून तिसèया स्थानावर हरयाणाच्या वान्या बन्सलने स्थान मिळवले आहे.