मोठा खुलासा! अमेरिकेविरुद्ध इराणला हा देश करत आहे गुप्त मदत

    दिनांक :08-Mar-2026
Total Views |
वॉशिंग्टन, 
iran-america-russia मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षात आता रशियाची भूमिका अधिक स्पष्ट होत असल्याचे संकेत मिळत आहेत. रशियाकडून इराणला दिल्या जाणाऱ्या गुप्त सहाय्यामुळे अमेरिकेची चिंता वाढली असून या पार्श्वभूमीवर अमेरिकेने रशियाला थेट इशारा दिला आहे. इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने जोरदार प्रत्युत्तर देत आखाती प्रदेशातील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरू केले आहेत. सुरुवातीला काही दिवसांत युद्ध थांबेल असा दावा करण्यात येत होता, मात्र आठवडा उलटूनही संघर्ष तीव्रच होत चालला आहे.

iran-america-russia 
 
अमेरिकेचे मध्यपूर्व विषयक विशेष प्रतिनिधी स्टीव्ह विटकॉफ यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वाचा खुलासा केला. त्यांच्या मते, रशिया इराणला लक्ष्यांची अचूक माहिती देत आहे. या माहितीद्वारे इराणला अमेरिकन युद्धनौका, लढाऊ विमाने आणि इतर लष्करी साधनांवर नेमकेपणाने हल्ले करणे शक्य होत आहे. अमेरिकेने रशियाला अशी मदत तात्काळ थांबवण्याचा कडक इशारा दिला आहे. या पत्रकार परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही उपस्थित होते. iran-america-russia मात्र त्यांनी रशियाच्या या कथित मदतीला फारसे महत्त्व दिले नाही. गेल्या काही दिवसांत इराणची परिस्थिती कठीण झाली असल्याने रशियाकडून मिळणाऱ्या माहितीतून फारसा फरक पडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, रशिया आणि इराण यांच्यातील वाढती जवळीक या संघर्षामागील महत्त्वाचा घटक मानली जात आहे. युक्रेनविरुद्ध चालू असलेल्या दीर्घ युद्धामुळे रशियाला शस्त्रास्त्रांची गरज वाढली असून त्यासाठी इराणकडून मदत मिळत आहे. iran-america-russia दुसरीकडे, अणुकार्यक्रम आणि काही संघटनांना दिलेल्या पाठिंब्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटा पडलेल्या इराणसाठी रशियाची साथ महत्त्वाची ठरत आहे. या पार्श्वभूमीवर रशिया-इराण संबंध अधिक मजबूत होत असल्याचे चित्र दिसत असून त्यामुळे मध्यपूर्वेतील संघर्षाला नवे आणि अधिक गुंतागुंतीचे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.