हिंदू स्वातंत्र्य असलेला धर्म : सोलापूरकर

    दिनांक :08-Mar-2026
Total Views |
* हिमालय विश्वमध्ये विशाल हिंदू संमेलन
वर्धा, 
Hindu Sammelan तुम्ही आमच्या धर्मात प्रवेश करा. आम्ही तुम्हाला अमूक देऊ वगैरे म्हणणारा आमचा हिंदू धर्म नाही. आमचा धर्म स्वातंत्र देणारा आहे. आमच्याकडे देवाला नमस्कार करण्यासाठीचेही बंधनं नाहीत. पण, आम्ही आमची संस्कृती टिकलवी आणि जोपसली पाहिजे. हिंदू आपली संस्कृती आणि परंपरा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते विचारवंत राहुल सोलापूरकर यांनी केले.स्थानिक हिमालय विश्व येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने शनिवार ७ रोजी सायंकाळी आयोजित विशाल हिंदू संमेलनात ते बोलत होते. यावेळी नगर संघचालक डॉ. प्रसाद देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी हिमालय विश्व रेसिडेन्सीचे संस्थापक मुरधीधर फाले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सीमा पांढारकर यांची व्यासपिठावर उपस्थिती होती.
 
 
hinsdu
 
 
सोलापूरकर यांनी विविध दाखले देत हिंदू समाज, परंपरा, संस्कार आणि संस्कृतीची व्याख्या मांडली. काही चुकीच्या गोष्टींवर भाष्य करीत हिंदू समाजावर होणार्‍या टीकांचीही त्यांनी माहिती दिली. शिकागो येथे झालेल्या भाषणात विवेकानंद पहिल्या ५ व्यतीमध्ये बोलले. भाषषणाला उठतानान त्यांना घाम फुटला होता. पाय लटलटत होते. ५ मिनिटांच्या भाषणात त्यांनी हिंदू रिलीजन समचजावून सांगितला. बूंध आणि भगिनी म्हणताच टाळ्यांचा कडकटात सभागृहात झाला. आपण हजारोंनी टाळ्या वाजवल्याचे म्हणतो. परंतु, ते सभागृह आपण बघितले आहे. त्या ४०० ते ५०० पेक्षा जास्त कोणी बसु शकत नाहीत. या गोष्टीतून आपण बाहेर आले पाहिजे, असे ते म्हणाले.
 
 
 
इतर धर्म धर्मांतरासाठी जेव्हा एखाद्याला गळाला लावतात तेव्हा माझ्या धर्मात प्रवेश करा मोक्ष मिळेल, असे त्याला पटवून देतात. हिंदू मात्र असा म्हणत नाही. आमचा धर्म नीती नियमानी बांधलेला नाही. स्वातंत्र्य असलेला धर्म. हिंदू आपली संस्कृती आणि परमपरा आहे म्हणून आम्ही भारत माता, भारत वर्ष म्हणतो, असे ते म्हणाले. आजही काही सरस्वती नदीच नाही ते थोतांड आहे, असे म्हणतात. परंतु, आमच्या चारही वेदांमध्ये सरस्वतीचा उल्लेख आहे. देवाची आरती झाल्यानंतर आम्ही मंत्रपुष्पांजली म्हणतो. त्यातही आम्ही धर्माचा, संस्कृतीचा आदर व्यत करतो. आम्ही वेदकाळापासुन श्रेष्ठच होतो. मात्र, सर्वात श्रेष्ठ ते सर्वात भ्रष्ट असा प्रवास आपला झाला. गेल्या १४ वर्षात बदल झाल्याचे दिसत आहेत. इथले लोकं शब्द पाळणारे आहे. स्वतःला श्रेष्ठ म्हणतात. परिवर्तनासोबत आवश्यक आहे. काळाचा बदल स्वीकारलाच पाहिजे. मात्र, आपलं स्वातंत्र्य ठेवत. आपले संस्कार आणि संस्कृतीही टीकवली पाहिजे. संस्कृती टिकवणं महत्त्वाची गोष्ट आहे. संस्कृती म्हणजे काय आपल्या भाषेमध्ये आपण टिकवलेली संस्कृती बाहेर चार चौघात वावरत असताना जे जे नीती आजी आजोबांपासून आपल्या घराण्याने मला घालून दिली होती ते पाळण्याचा प्रयत्न केला म्हणजे संस्कृतीचे रक्षण! प्रभू राम हे ईश्वतू घराण्याचे होते. राम ६६ आणि लवकुश ६७ वे वंशज होते, असे त्यांनी
सांगितले.
 
 
Hindu Sammelan  आज आम्ही मुलांना संस्कृती सांगत नाही. मात्र आता विश्व बंधूत्व सांगितले पाहिजे. जग भर फिरताना फादर लॅण्ड म्हटल्या जाते. आम्ही मातृभूमी म्हणतो. आम्ही प्रत्येक रूपात स्त्री बघितली आहे. ५ हजार वर्षांपूर्वी स्त्री, मातृसत्ताक पद्धती होती असे त्यांनी सांगितले. हिंदू धर्म शीतल आहे. तो इतिहास जपला पाहिजे. कुटुंब प्रबोधन म्हणजे काय तर कुटुंबात संवाद झाला पाहिजे. आपला इतिहास जिवंतपणाचा आहे. आम्ही कोणाची भूमी हडपली नाही असे ते म्हणाले. सोलापूरकर यांचे व्याख्यान होताच प्रेक्षकांनी उभे राहुन टाळ्या वाजवल्या. यावेळी मुरधीधर फाले व डॉ. सीमा पांढारकर यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमापुर्वी परिसरातून स्कूटर रॅली काढण्यात आली तर व्याख्यानानंतर हिमालय विश्व मधील महिलांनी लव्ह जिहादवर नाटीका सादर केली.
प्रास्ताविक हरीश गांधी यांनी केले. संचालन सुजाता जोशी यांनी तर आभार वर्षा सोते यांनी मानले. यशस्वीतेकरिता
मुकुंद पुहुरकर, रितेश कुलधरिया, भूषण कठाळे, सुभाष गाढिबांधे, राजेंद्र आचार्य, शेखर मशानकर, संजय नाईक, रमेश घाडिया, अरुण पोतदार आदींनी परिश्रम घेतले.