शिक्रापूर,
Hivre Kumbhar school violence, शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सातवीच्या वर्गातील सात विद्यार्थ्यांना वर्गातील एका विद्यार्थ्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संतप्त पालकांनी शाळेत धाव घेऊन संबंधित शिक्षकावर कारवाई करून त्याची बदली करण्याची मागणी केली आहे.
घटनेनंतर शाळेत पालक, ग्रामस्थ, पदाधिकारी आणि शिक्षक यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीदरम्यान माजी सरपंच दीपक खैरे आणि अमोल जगताप यांच्या उपस्थितीत काही ग्रामस्थांनी सातवीच्या वर्गाची तपासणी केली. तपासणीत वर्गात शीतपेये, अल्कोहोलयुक्त पेये, तंबाखू तसेच इतर काही पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळल्याने एकच खळबळ उडाली.विद्यार्थ्यांनी उपस्थितांसमोर सांगितले की, वर्गातील एका विद्यार्थ्याची मोठी दहशत असून तो वारंवार इतरांना मारहाण करतो. विद्यार्थ्यांनी आरोप केला की, संबंधित विद्यार्थीवर शिक्षक पाठीशी असतो. घटनेच्या वेळी त्या विद्यार्थ्याचे पालक उपस्थित नव्हते, त्यामुळे उपस्थितांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
घटनेचे गांभीर्य लक्षात Hivre Kumbhar school violence, घेऊन गटशिक्षणाधिकारी प्रीतम कोकणे, पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे, पोलिस शिपाई नारायण वाळके, राम जाधव, नारायण सानप, योगेश आव्हाड आणि गणेश केंद्रे यांनी शाळेत भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या वेळी विद्यार्थ्यांनी मारहाणीची माहिती पोलिसांसमोर दिली आणि शरीरावरील जखमांचे व्रणही दाखवले.पालकांनी दोषी शिक्षकावर कारवाई करून त्याची बदली करण्याची मागणी केली आहे. गटशिक्षणाधिकारी प्रीतम कोकणे आणि पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे यांनी प्रकरणाची सविस्तर चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.“हिवरे कुंभार जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण झाली, ही घटना निंदनीय आहे. पालकांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित विद्यार्थी आणि त्याच्या पालकांना बोलावून समज घेतला जाईल,” असे प्रीतम कोकणे यांनी सांगितले.