सिलिंडरचे दर ६० रुपयांनी वाढले

    दिनांक :08-Mar-2026
Total Views |
पुणे
LPG cylinder price hike Pune, जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका आता सामान्यांच्या ताटावर जाण्यास सुरुवात झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या वाढीमुळे घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर ६० रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. पुण्यातील गृहिणींच्या बजेटवर हा फटका मोठ्या प्रमाणावर जाणवत असून, सामान्यांमध्ये संताप पसरला आहे.
 

LPG cylinder price hike Pune, 
गेल्या काही दिवसांपासून महागाईने जीवनावश्यक वस्तू महागल्या असून, आता घरगुती गॅस सिलिंडर दरात वाढ झाल्यामुळे सामान्यांना अधिक आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. तेल कंपन्यांनी नवीन दर आजपासूनच लागू केले आहेत. पुण्यात गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांना आधीपेक्षा ६० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. आधी ८५६ रुपयांवर उपलब्ध असलेला सिलिंडर आता ९१६ रुपयांवर विकला जात आहे. त्यात सोसायटीसारख्या जागी पोहचवण्यासाठी अतिरिक्त २० ते ३० रुपये लागणार आहेत.दरवाढीच्या LPG cylinder price hike Pune,  प्रमुख कारणांमध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाचे दर वाढणे, आंतरराष्ट्रीय वाहतुकीवर मर्यादा, पुरवठा साखळीत अडथळा आणि डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर होणे यांचा समावेश आहे.
सामान्य नागरिक LPG cylinder price hike Pune,  संतप्त आहेत. धनकवडीतील गृहिणी सुनीता शहाणे म्हणाल्या, “आधीच डाळी, तेल आणि भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यात आता गॅस सिलिंडर ६० रुपयांनी महागल्याने महिन्याचे बजेट जुळवणे मोठा प्रश्न बनला आहे.”व्यावसायिक गॅस आणि घरगुती सिलिंडरसाठी नवीन दरांची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली असून, आधी बुकिंग केलेल्या ग्राहकांनाही नवीन दरानुसार पैसे मोजावे लागले आहेत.