१४ गाळ्यांच्या बांधकामावर चौकशीचे आदेश
उमरखेड,
सहकार महर्षी भाऊसाहेब Mane Ginning माने जिनिंग अँड प्रेसिंग संस्था येथे सुरू असलेल्या १४ गाळ्यांच्या बांधकामावरून राजकीय वितंडवाद सुरू झाला असून या कामातील कथित अनियमिततेबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून उमरखेड सहायक निबंधकांना दिलेल्या आदेशानुसार संबंधित बांधकाम प्रकरणाची सखोल चौकशी होईपर्यंत काम तात्पुरते थांबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संस्थेच्या संचालक मंडळाच्या ३१ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या सभेत जीन क‘मांक २ १४ गाळे बांधण्याचा विषय चर्चेला आला होता. या कामासाठी तीन निविदा प्राप्त झाल्या होत्या.
सर्वात कमी दर असलेली निविदा १४२५ रुपये चौरसफूट होती. मात्र बैठकीत निविदा प्रकि‘या पूर्ण न करताच उघडताच अध्यक्षांच्या सांगण्यावरून काम सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप आहे. या संदर्भात संबंधितांनी शासन स्तरावर तक्रार केल्यानंतर मृद व मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या निदर्शनास हा विषय आणण्यात आला. त्यानंतर तक्रारीतील मुद्यांची सखोल चौकशी करून चौकशी पूर्ण होईपर्यंत बांधकामास स्थगिती द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
Mane Ginning दरम्यान, या प्रकरणामुळे संस्थेच्या व्यवस्थापनावर आर्थिक नुकसानाचेही आरोप करण्यात आले असून सुमारे २० ते २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा तक‘ारदारांनी केला आहे. जिल्हा उपनिबंधकांनी सहायक निबंधकांना संपूर्ण प्रकरणाची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच चौकशीनंतर आवश्यक असल्यास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम अंतर्गत पुढील कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे उमरखेड येथील सहकारी क्षेत्रात राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून येत्या काळात हा वाद चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.